बेडूक आणि बैलाची कहाणी

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (19:10 IST)
फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना वाटायचे की आपले वडीलच जगातील सर्वात ताकतवान आणि मोठे आहे. तो बेडूक देखील आपल्या मुलांना आपल्या सामर्थ्याबद्दल खोट्या गोष्टी ऐकवायचा आणि त्यांच्या समोर शक्तिशाली होण्याचा देखावा करायचा .त्या बेडूकला आपल्या शारीरिक सौंदर्यावर फार अभिमान असे. असेच दिवस सरत गेले. 
 
एके दिवशी बेडकाची मुलं खेळता-खेळता तलावाच्या बाहेर गेले. ते तलावाच्या नजीकच्या गावात जाऊन पोहोचले त्यांनी तिथे एक बैलाला  बघितले. त्या बैलाला बघतातच त्यांना खूप आश्चर्य झाले . या पूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितले नव्हते. त्या बैलाला बघून ते फार घाबरले.ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता.गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला. बेडकाची  मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली. त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते. त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकतवर आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवले. हे ऐकतातच बेडकाचे अहंकार दुखावले गेले .त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले की "एवढा मोठा प्राणी होता का तो ?" त्याचा मुलाने म्हटले की "हो तो तुमच्या पेक्षा अधिक मोठा प्राणी होता."   
आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक छाती फुगवून विचारले" की एवढा मोठा होता का तो प्राणी ?" मुलांनी सांगितले की ,हे तर काहीच नाही या पेक्षा देखील मोठा होता तो." असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फुगवायला सुरू केले असं करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यारखे फाटले आणि त्याला खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले. 
 
तात्पर्य -या कहाणी पासून शिकवण मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीचे गर्व करू नका. गर्व केल्याने स्वतःचे नुकसान होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती