शेखचिल्लीची गोष्ट "सर्वात मोठं खोटं"

सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (13:06 IST)
एकदा एक नवाब होते. त्यांच्या दरबारात एक शेखचिल्ली नावाचा फार हुशार माणूस होता. त्या नवाबाची सवय होती की तो आपल्या राज्याच्या कारभारात लक्षच घालत नसायचा. तो आपला सर्ववेळ शिकार, बुद्धिबळ किंवा इतर खेळात घालवायचा. एके दिवशी त्यांनी आपल्या सभेत एका स्पर्धेचे आयोजन केले, त्या स्पर्धेत जो सर्वात मोठं खोटं बोलेल त्याला विजेता म्हणून सुवर्णाच्या सहस्त्र मोहरे देणार अशी उद्घोषणा केली. बरीचशी लोकं ती स्पर्धा जिंकण्यासाठी पुढे आली आणि आपापल्यापरी खोटं बोलू लागली. एक म्हणाला की सरकार मी म्हशीपेक्षा आकाराने मोठ्या अश्या मुंग्या बघितल्या आहेत. ज्या म्हशी पेक्षा कित्येक पटीने अधिक दूध देतात. असे असू शकत नवाब म्हणाला.
 
'सरकार दररोज रात्री मी उडत चंद्रापर्यंत जातो आणि सकाळी परत येतो' एकाने म्हटले. असू शकत की आपल्याकडे अशी काही शक्ती असेल. नवाब म्हणाला. 
 
एक जाड माणूस समोर आला आणि आपल्या पोटाकडे हात दाखवत म्हणाला की 'सरकार मी एकदा चुकून कलिंगडाच्या बिया गिळल्या होत्या तेव्हा पासून माझ्या पोटात लहान लहान कलिंगड येतात आणि पोटातच फुटून जातात, त्यामुळे माझं पोट भरतं आणि मला जेवण्याची गरज देखील पडत नाही. यावर नवाब म्हणतो, की असू शकतं की आपण एखाद्या बलिष्ठ अश्या कलिंगडाचे बियाणं खालले असणार.
 
तेवढ्यात शेखचिल्ली विचारतो की 'सरकार आता मी काही बोलू का'? होय, शेखचिल्लीची फिरकी घेत नवाब त्याला म्हणतो की शेखचिल्ली आता तुझ्या कडून कोणत्या प्रतिभावंत शब्दांची अपेक्षा करावी?
 
शेखचिल्ली यावर उत्तरतो- 'सरकार आपण या सम्पूर्ण राज्याचे सर्वात मूर्ख माणूस आहात, आणि आपल्याला या सिंहासनावर बसण्याचा काहीही अधिकार नाही.'
 
हे ऐकताच नवाब फार चिडतो आणि आपल्या सैनिकांना त्याला बंदी बनवायला सांगतो आणि म्हणतो' की तुझी हिम्मत कशी झाली असे म्हणायची, आमच्या राज्यात राहतो आणि मलाच वाईट म्हणतो. जर आताच तू माफी मागितली नाही तर आम्ही तुझे शिरविच्छेद करून टाकू.

शेखचिल्ली म्हणतो 'की सरकार आपणच म्हटलं होत न की आपणास या जगाचे सर्वात मोठं खोटं ऐकायचे आहेत. मी जे काही म्हटले ते या पेक्षा खोटं काय असणार. नवाबला समजतचं नाही, की शेखचिल्ली आता जे काही बोलत आहे ते खोटं आहे की या पूर्वी तो जे काही बोलला ते खोटं होत. 
 
नवाब त्यांचा बुद्धीमानीचं कौतुक करतो आणि त्याला सहस्त्र सुवर्ण मोहऱ्या देतो. अश्याप्रकारे शेखचिल्ली ने आपल्या युक्तीचा वापर करून नवाब समोर सर्वात मोठं खोटं सादर केलं आणि नवाबाकडून बक्षीस मिळवलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती