लांडगा आला रे आला '

बुधवार, 24 मार्च 2021 (20:44 IST)
फार पूर्वी एका खेड्या गावात, एक मेंढपाळ राहायचा. त्याचे नाव मोहन होते. त्याच्या कडे बऱ्याच मेंढ्या होत्या, तो मेंढपाळ दररोज आपल्या मेंढरांना चारायला घेऊन जवळच्या जंगलात जात असे. तो सकाळी त्यांना घेऊन जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा.त्या मेंढपाळांचे दिवसभराचे काम हेच होते. त्याच्या मेंढऱ्या चारत असायचा आणि तो बसून राहायचा. बसून बसून त्याला कंटाळा आला की तो आपल्या करमणुकीचे नवे मार्ग शोधायचा. मोहन फार खट्याळ होता. लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद मिळायचा. 
एके दिवशी त्याला स्वतःची करमणूक करण्याची युक्ती सुचली . त्याने विचार केला की या वेळी गावकरींची मजा करू या. असं विचार करून त्याने मोठ्या मोठ्याने ''लांडगा आला रे आला'' असं म्हणून ओरडायला सुरु केले. त्याच्या आवाजाकडे  गावकरी काठ्या घेऊन त्याच्या दिशेने धाव घेत आले. तिथे ते पोहोचल्यावर मोहन जोरजोरात हसायला लागला आणि कशी गम्मत केली असे म्हणू लागला. गावकरीना त्याचा राग आला आणि ते मोहन ला म्हणाले की ''मूर्खा आम्ही आपले कामे सोडून तुला वाचविण्यासाठी आलो आणि तू आमचीच टिंगल करत आहे." असं म्हणत ते पुन्हा आप आपल्या कामाला निघून गेले. 
काही दिवसानंतर मोहन ने पुन्हा गावकरींची गम्मत केली पुन्हा बेचारे गावकरी धावत आले आणि मोहन त्यांना बघून हसायला लागला. असे मोहन ने तीन चार वेळा केले. त्या दिवशी पासून गावकरींनी त्याच्या वर विश्वास ठेवणे बंद केले. 
 
एके दिवशी सर्व गावकरी शेतात काम करत असताना पुन्हा मोहन चा ओरडायचा आवाज आला."अरे कोणी वाचवा, लांडगा आला रे आला" वाचवा रे वाचवा' गावकरी म्हणाले की ''या मोहन ने पुन्हा आपली गम्मत करायचे ठरवले दिसत आहे. आज तर आपण कोणीच त्याच्या मदतीला जायचे नाही.'' मोहन ओरडत राहिला पण कोणीही त्याच्या मदतीसाठी गेले नाही.मोहनचा ओरडण्याचा आवाज सतत येत होता. तरी ही कोणीही त्याच्या दिशेने गेले नाही. परंतु यंदा लांडगा खरंच आला होता. तो त्या मेंढपाळ मोहन च्या सर्व मेंढऱ्या खाऊन गेला. रात्री देखील मोहन घरी आला नाही तर सर्व गावकरी त्याला शोधायला निघाले आणि त्याने तिथे जाऊन बघितले की मेंढपाळ्याच्या सर्व मेंढऱ्या मेलेल्या होत्या आणि मोहन झाडावर बसून रडत होता. मोहन ला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली होती. त्याच्या खोटेपणामुळे आज त्याला त्याच्या मेंढऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्याने गावकरींची क्षमा मागितली आणि  पुढे असे कधीही न करण्याचे वचन दिले. 
 
शिकवण - या कथेतून शिकवण मिळते की कधीही खोटं बोलू नये. खोटं बोलणं पाप आहे. असं केल्याने आपण एखाद्याचा विश्वास गमावून बसतो. वेळ आल्यावर कोणीही आपली मदत करत नाही.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती