सज्जनतेचा डोळा

मंगळवार, 12 जून 2018 (16:53 IST)
डायोजीनसची एक कथा आहे. तो भर दुपारी 12 वाजता पेटविलेला कंदील घेऊन घरभर फिरत होता. तत्त्वज्ञानी थोडेफार वेडे असतातच. तरीही डायोजीनसचे हे वागणे पाहून लोकांनी त्याला विचारले, 'अहो, तुम्ही कोठे चालला आहात?' डायोजीनस म्हणाला, मी सज्जनांच्या शोधात चाललो आहे. पण अजूनपर्यंत मला एकही सज्जन भेटला नाही.' त्यंचा हा संवाद सुरू असतानाच तिथे एक दुसरा तत्त्ववेत्ता आला होता. त्याने समजावले, 'तुला सूर्याच्या प्रकाशातही सज्जन सापडत नाही. म्हणून तू कंदील घेऊन शोधत आहेस?' ह्याचा अर्थ सज्जनता बघण्याचा डोळाच तुझ्याकडे नाही. सज्जनतेचा डोळा, सज्जनतेची नजर घेऊन जगात फिर म्हणजे तुला सज्जन सापडतील.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती