बोध कथा : सिंह आणि ससा

मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:29 IST)
एका जंगलात एक भासुरक नावाचा सिंह राहायचा. तो निर्दयतेने दररोज बऱ्याच प्राण्यांना शिकार करून मारून टाकायचा.एके दिवशी जंगलातील सर्व प्राणी एकत्ररित्या सिंह कडे गेले आणि म्हणाले -' महाराज आपले जेवण म्हणून दररोज एक प्राणी आपल्या कडे येईल आणि आपले भक्षण बनेल. आपल्याला कोठेही  जावे लागणार नाही. 
सिंहाने ऐकून म्हटले- ' विचार तर चांगला आहे. पण जर या मध्ये खंड आला तर मी सर्वांना ठार मारेन.'
सर्व प्राणी निर्भिक होऊन भटकू लागले, ठरलेल्या प्रमाणे दररोज एक न एक प्राणी त्या सिंहाकडे त्याचे जेवण म्हणून जाऊ लागला. 
 
एके दिवशी  एक ससा जाण्यासाठी निघतो.चालता चालता  तो विचार करतो की अशी काही युक्ती काढावी लागेल ज्यामुळे मी आणि सर्व प्राण्यांचा जीव देखील वाचेल. 
वाटेतून चालत चालत त्याला एक विहीर दिसते. तो त्यामध्ये वाकून बघतो तर त्याला त्याची सावली त्या पाण्यात दिसते. आधी तर तो घाबरतो  पण नंतर त्याला एक युक्ती सुचते. हळू हळू चालत चालत तो संध्याकाळी त्या सिंहा कडे पोहोचतो त्याला बघून भुकेने व्याकुळ झालेला सिंह विचारतो का रे उशीर का झाला ? कुठे गेला होतास? एक तर तू एवढा लहान आहेस आणि उशिरा आलास. थांब आधी मी तुला खातो नंतर मग मी सकाळी सर्व प्राण्यांना खाऊन टाकेन.
सस्याने मान खाली वाकवून त्याला म्हटले- ' स्वामी माझी काहीच चूक नाही आणि इतर प्राण्यांची  देखील नाही. आम्ही लहान असल्यामुळे प्राण्यांनी 5 ससे आपल्या साठी पाठविले होते पण... पण काय ? पण त्या मोठ्या सिंहाने ते चार ससे खाऊन टाकले मी कसंतरी आपले प्राण वाचवून आलो आहोत. 
 
सिंहाने चिडून विचारले काय दुसरा सिंह ? ससा म्हणाला की मी घरातून वेळेतच निघालो होतो पण त्या दुसऱ्या सिंहा ने म्हटले की ' मी इथला राजा आहे जर कोणा मध्ये सामर्थ्य आहे तर त्याने माझ्या समोर यावे.' भासुरक रागावून म्हणाला 'मला त्याच्या कडे घेऊन चल. बघू कोण आहे तो स्वतःला राजा म्हणवणारा.'   
 
पुढे-पुढे ससा आणि मागे मागे भासुरक, दोघे ही त्या विहिरी कडे गेले ' ससा म्हणाला की आपल्याला बघून तो आपल्या घरात जाऊन लपला आहे मी दाखवतो आपल्याला असं म्हणत ससा सिंहाला विहीर कडे नेतो आणि वाकून बघायला सांगतो. भासुरक विहिरीं मध्ये वाकून बघतो तर त्याला आपली सावली पाण्यात दिसते. तो जोरात गर्जना करतो तर त्याचीच आवाज परत येते. रागाच्या भरात तो विहिरीच्या पाण्यात दिसणाऱ्या सावलीच्या सिंहावर उडी टाकतो आणि त्या पाण्यात बुडून मरतो. अशा प्रकारे जंगलातील सर्व प्राणी सशाच्या युक्तीमुळे सिंहाच्या तावडीतून मुक्त होतात. आणि आनंदाने राहू लागतात.  
 
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती