जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास

सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (14:27 IST)
एकदा बादशहा अकबर चे केस एक न्हावीकापत होता. न्हावी म्हणाला -''हुजूर आपण या राज्यात तर चांगली व्यवस्था ठेवली आहे पण आपले पितर स्वर्गामध्ये कसे आहे हे माहिती केली आहे का?ते सर्व चांगले तर आहे ना ? त्यांना कसली कमतरता तर नाही ? आपण तपास केला आहे का?
 
बादशहा म्हणाले -' कसं वायफळ बोलत आहेस तू आम्हाला कसं काय माहीत असणार की स्वर्गात आमचे पितर कसे आहे?
या वर तो न्हावी म्हणाला की इथेच जवळ एक तांत्रिक राहतो तो लोकांना जिवंतच स्वर्गात पाठवतो त्याच्या कडे काही तरी इष्ट आहे.त्याच्या कडे काही सिद्धी आहे त्याने बऱ्याच लोकांची त्यांच्या पितरांना भेट करवून दिली . जेणे करून आपण आपल्या पितरांना भेटून त्यांच्या बद्दल जाणून घेऊ शकता. 
 
अकबर म्हणाले की आम्हाला देखील आमच्या पितरांना भेटायचे आहे ते कसे आहे हे जाणून घ्यायचे आहे. ते म्हणाले की बिरबल आमचे चांगले मित्र आहे आम्ही  त्यांनाच आमच्या पितरांना भेटायला पाठवू .
 
या वर तो तांत्रिक म्हणाला की फारच कमी लोक तिथून परत येतात. अकबर म्हणाले की आम्हाला विश्वास आहे की बिरबल परत येतील. बिरबलाने तांत्रिकाला विचारले की आपण स्वर्गात कसे पाठवता. तांत्रिक म्हणे  की आम्ही यमुनेच्या काठी लाकडाच्या मध्ये माणसाला उभे करून अग्नी पेटवतो आणि मी मंत्राचार म्हणून त्यांना स्वर्गात पाठवतो. 
 
बिरबलाने विचारले किती वेळात माणूस परत येतो .या वर तांत्रिक म्हणाला की दोन महिने लागतात. पण काही लोक परत येतच नाही. बिरबलाने बादशहा ला म्हटले की मला दोन महिन्यासाठी स्वर्गात जायचे आहे त्यापूर्वी काही काम संपवायचे आहे मला आपण 5 दिवसाची मुदत द्या. 
 
ठरलेल्या दिवशी बिरबलाला लाकडांच्या मध्ये उभारून अग्नी पेटवली आणि तांत्रिक मंत्र म्हणू लागला. नंतर त्याने सगळ्यांना सांगितले की बिरबल आता स्वर्गात गेले असं म्हणून सगळे परतले.
 
2 महिन्यानंतर बिरबल दरबारात आले. त्यांचे केस आणि दाढी वाढलेली होती. बिरबलाला बघून सगळ्यांना आश्चर्य झाले. आणि बादशहा खूश झाले. त्याने बिरबलाला विचारले की आपली दाढी का बरं वाढलेली आहे. आणि आमचे पितर स्वर्गात कसे आहे. 
 
बिरबल म्हणाले की ते सर्व आनंदात आहे पण स्वर्गात एकही न्हावी नाही त्यासाठी सगळ्यांनी न्हाव्ह्याला तिथे बोलविले आहे. अकबर नाव्ह्याला म्हणाले की उद्या तू स्वर्गात जाशील.
 
अकबराचे म्हणणे ऐकून न्हावी घाबरला आणि त्याने जाण्यास नकार दिले. आणि बिरबल ला आपल्या वाटेतून काढण्यासाठी हे सर्व योजना आखली होती असे सांगितले आणि मी असे या दरबाऱ्याच्या एका मंत्र्याच्या सांगण्यावरून केले होते. 
 
बिरबलाला अकबराने विचारले की आपण सुखरूप कशे राहिला त्यावर मी त्या लाकडाच्या खाली एक बोगदा बनवून घेतला होता त्यामधून थेट निघून मी माझ्या घरातच बसलो होतो अकबर ने बिरबलाचे खूप कौतुक केले आणि त्या मंत्र्याला आणि नाव्ह्याला आणि तांत्रिकाला तुरुंगात पाठविले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती