एक "चांगला ड्रेस"

सोमवार, 3 डिसेंबर 2018 (12:31 IST)
एका दुपट्ट्यासाठी टॉप, त्या टॉपसाठी सलवार,
ती सलवार छान दिसत नाही म्हणून मग एक लेगिंग,
मग लेगिंग अशीही आहेच तर त्यावर परत एक मॅचिंग टॉप,
मग त्या टॉपसाठी परत एक स्टोल,
मग त्या स्टोलसाठी एक वेस्टर्न टॉप,
मग त्या टॉपसाठी जीन्स किंवा पलाझो,
मग त्यावर परत एक टॉप आणि त्या टॉपसाठी परत एक दुपट्टा
असं करत करत आठ आण्याच्या मसाल्यासाठी चार आण्याच्या कोंबड्या बायकांकडे इतक्या जमतात की एक अख्ख खुराडं सहज काढू शकतील.
 
आणि एवढं करुन परत बाहेर जायचं म्हणल की एक "चांगला ड्रेस" त्यांच्याकडे कधीच नसतो आणि
जगातला सर्वात सुंदर आणि कंफर्टेबल ड्रेस घरातला धुवट गाऊन च असतो!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती