लहान लहान क्षण हि पूरेत चेहऱ्यावर हसू फुलवायला

सकाळचा अलार्म बंद करून छान पाच मिनिटांची झोप काढणे
एखाद्या मीटिंग ला जाताना जड झालेले पाय आणि अचानक समोरून मीटिंग कॅन्सल होणे,
एखाद्याची अचानक आठवण यावी न त्याचाच call येणे
Tv चालू करावा न नेमके आपले आवडते गाणे सुरु होणे
बाहेर मस्त पाऊस न हातात चहाचा कप असणे
एखादा ड्रेस आवडावा दुकानातील आणि नेमका तो आपल्या बजेट मध्ये बसणे
विस्मृतीत गेलेली एखादी जुनी मैत्रीण अचानक रस्त्यात भेटणे
खूप भूक लागावी काही आणि समोर पाणीपुरिची गाडी दिसणे
आपणच कधी लावलेल्या रोपाची इवलीशी कळी डोकावताना बघणे
ध्यानीमनी नसताना एखाद दिवशी स्वतःसाठी हक्काचा वेळ मिळणे
सुख सुख म्हणतात ते आणखीन काय असते हो,
खूप सारा पैसा आणि luxuriesची गरजच नसते कधी,
लहान लहान क्षण हि पूरेत चेहऱ्यावर हसू फुलवायला
ह्या सगळ्यातुन मिळालेला आनंदच खरे बळ देतो जगायला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती