कालचा मेन्स डे स्पेशल

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:51 IST)
कालचा मेन्स डे स्पेशल
आजची_सकाळ
 
मी:- अरे व्वा, आज चक्क शिरा...!  किस खुशीमें?
 
सौ:- काही नाही, सहजच...आज 'इंटरनॅशनल मेन्स डे' आहे ना... म्हणून! 
 
मी:- तू पण घे की थोडा, आणि बच्चूला ठेवलाय का?
 
सौ:- अहो तुमच्यापुरताच केलाय, मला नकोय... अन् बच्चू गोड पदार्थाला तोंड लावत नाही, माहितीये ना?

मी:- अच्छा, पण शिरा मात्र मस्त जमलाय हं...! असा आधी कधी खाल्लाच नाही...
काजू, बदाम, चारोळी, वरून सढळ हाताने साजूक तूप...आता इथून पुढे असाच करत जा! 
 
सौ:- अहं,,, आता परत असा नाही जमणार?
 
मी:- का गं?
 
सौ:- अहो दिवाळीचे चार-पाच रव्याचे लाडू उरलेले होते, तुम्हा दोघांना किती आग्रह केला तरी कुणी खाईना.... मग ते बारीक केले, त्यात पाणी टाकून गॅसवर शिजवले, गरमागरम शिरा तैय्यार... परत असाच शिरा करायला शिळे लाडू कुठून आणू?
 
गिळा आता पटापट....!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती