प्रेमाची रिंगटोन

माझ्या आठणीनी तुझं ह्र्दय
व्हायव्रेट होत राहू दे
तुझ्या ह्रदयात माझ्या प्रेमाची
रिंगटोन वाजत राहू दे !
दूर सखे माझ्यापासून
गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू
भेटली नाहिस तरी चालेल
पण जाशील तिथे माझ्या आठवणिचं
नेटवर्क कव्हरेज असू दे
रिंगटोन वाजत राहू दे !
अन सखे एकटीच तू
निजशीलही कधी कधी
मी नसलेली उजाड स्वप्नं
बघशीलही कधी कधी
पण पापण्या उघडताच
तुझ्या डोळ्यात
माझा मिस्ड कॉल दिसू दे !
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाची
रिंगटोन वाजत राहू दे !
दूर दूर राहून असं
थकून जाशील तू सखे
वणवण सारी सारी करून
विझून जाशील तू सखे
अशावेळी मला भेटून
तुझी वॅटरी रिचार्ज होऊ दे !
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाची रिंगटोन वाजत राहू दे !
जमेल तसं प्रेम आपलं
टॉपअप करता यायला हवं
मोकळं बोलता यायला हवं
मोकळं बोलून टॉपअप करून
प्रेम मोबाइल राहू दे !
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाची 
रिंगटोन वाजत राहू दे. 

वेबदुनिया वर वाचा