पोट धरून हसा

* पोट धरून हसा
बायको - ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दाहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो, तुम्ही कधी घेऊन जाता ?
नवरा - मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!!!!
 
 
शिक्षिका- एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल.
विद्यार्थी- पैसे.
शिक्षिका- चूक..
मी अक्कल निवडली असती.
विद्यार्थी- तुमच बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं
बाईंनी त्याला चोप चोप चोपला...
 
 
'दहशत' म्हणजे काय ???
भर पार्टीत “बायकोचा फोन" म्हटल्यावर..जी शांतता पसरते त्यालाच दहशत म्हणतात..!!!
 

पिंटू: "ती समोरच्या बंगल्यात जी नविन मुलगी राहायला आलीय; ती "आम आदमी पार्टी ची मेंबर आहे"
बंडया: "तुला कस माहीत"???
पिंटू: आज सकाळी मी तीला हात दाखवला...तर तिने मला "झाडू दाखवला"
 
 
गुरूजी: पाण्याचे रेणुसुत्र काय ?
झंप्या: H2ch3n3hfbi5h6o8O
गुरूजी: चुक
झंप्या: सर हे गढूळाच पाणी आहे
गुरूजी सैरावैरा पळत आहे...
 

इंग्रजी आणि मराठी शाळेतली मुलं प्राणी संग्राहलयात गेली.
इंग्रजी शाळेतली मुलं: Wow! Look At That Monkey,He's So Cute!!
मराठी शाळेतली पोरं: ते बघ रम्या तुझा बाप..कसा झोपलाय!! दगड मारू का त्याला....
 

मी बर्‍याच वर्षापासून बघतोय अनेक सरकारं आली अन् गेली. पण गरीबाची व शेतकर्‍यांची काळजी फक्त एकाच पक्षाला आहे. 
आणि तो पक्ष म्हणजे विरोधी पक्ष...

वेबदुनिया वर वाचा