थंड पाणी पिण्यास मनाई का, हे वाचल्यावर आजच सोडाल

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (15:20 IST)
आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे अंतर्गत तापमान 98 डिग्री सेल्सियस असते. तर आम्हाला या प्रकारे पाणी प्यायला ज्याने अन्न आणि इतर पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी या तपमानाजवळ असेल.
 
जेव्हा आपण गार पाणी पिता तेव्हा पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आपल्या शरीराला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. अशात ऊर्जेचं अवांछित नुकसान होतं. जर आपल्याला गरम पाणी पिण्याची इच्छा होत नसेल तर आपण किमान खोलीच्या तापमानानुसार पाणी पिणे पचन क्रिया दुरुस्त ठेवण्यास योग्य ठरेल.
 
कोमट पाणी पिण्याचे फायदे-
आयुर्वेदच नव्हे तर अनेक संस्कृतींचा विश्वास आहे की गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे. थंड पाणी रक्तवाहिन्या प्रतिबंधित करतं आणि अशात आपलं शरीर अन्नामधून सर्व पोषक आणि जीवनसत्त्वे आत्मसात करण्यास सक्षम नसतं. कोमट पाणी पचन प्रक्रियेला गती देतं आणि हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील योग्य आहे. गार पाण्यामुळे फॅट्स गळत नाही आणि हळू-हळू लठ्ठपणा वाढत राहतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती