बटाट्याचा रस पिण्याचे 6 फायदे, जाणून घ्या

शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:42 IST)
उकळलेले किंवा कच्चे बटाटे आपण अनेक चटपटीत पदार्थ बनविण्यात वापरले असतील पण कधी आपण बटाट्याचा रस प्यायला आहात का? जर नसेल प्यायला तर प्यायला सुरू करून द्या कारण याने आपल्याला लाभतील आरोग्याचे फायदे. सध्या जाणून घ्या 6 फायदे-
 
1 कच्च्या बटाट्याचा रस पाण्यासोबत रोज अर्धा कप प्या. हा रस रिकाम्या पोटी प्यावा. याने गॅसची तक्रार होणार नाही.
 
2 शोधाप्रमाणे कच्च्या बटाट्यांचा रस कर्करोग, उच्च रक्तदाब आणि किडनीव्यतिरिक्त अनेक प्रकाराच्या आरोग्य समस्यांपासून बचाव करतं.
 
3 जर आपण मधुमेह रोगी असाल तर हा रस आपल्यासाठी फायदेशीर आहेत. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात हा रस प्रभावी आहे.
 
4 हा रस आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवेलच यासोबतच ‍लिव्हरसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यात मदत करेल.
 
5 हा रस नियमित सेवन केल्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होईल. हा रस त्वचेला पोषण देऊन तेजस्वी दिसण्यात मदत करेल. त्वचेवर हा रस लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होईल.
 
6  हा रस सेवन केल्याने शरीरातून सर्व हानिकारक तत्त्व काढण्यात मदत मिळेल आणि शरीरातील सर्व अंगांची सफाई होईल.
 
एवढंच नव्हे तर हृदयवाहिनी संबंधी समस्यांमध्येही बटाट्याचा रस फायदेशीर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती