हे घरगुती उपाय मायग्रेनच्या वेदनेतून आराम देतील...

गुरूवार, 31 जानेवारी 2019 (15:17 IST)
मायग्रेनची समस्या म्हणजे सतत डोकेदुखी होणं, जे मेंदूच्या अर्ध्या भागात होत आणि 1 दिवसापासून तर 3 दिवसांपर्यंत राहू शकतो. आपल्यालाही जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय वेदना कमी करण्यास मदत करतील.
 
1. द्राक्षाचा रस प्या - द्राक्षांमध्ये अनेक डायटरी फायबर, विटामिन ए, सी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे मायग्रेनच्या वेदनेतून आराम देतात. मायग्रेनचा त्रास असल्यास याचा रस दिवसातून दोन वेळा घ्या.
 
2. आलं - आलं तणाव आणि शारीरिक वेदना दूर करण्यात मदत करता, याशिवाय ते मायग्रेनच्या त्रासात ही आराम देतात. आल्याच्या रसात लिंबाचा रस घालून किंवा आल्याचा रस रुग्णाला दिल्याने रुग्णाला आराम मिळतो.  
 
3. दालचिनी - मायग्रेनने डोकेदुखी झाल्यावर दालचिनी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि कपाळावर लावा. मग अर्धा तासाने गरम पाण्याने कपाळ धुवा, असे केल्याने नक्कीच त्रास कमी होण्यास मदत मिळेल.   
 
4. प्रकाशाच जाणे टाळा - मायग्रेनचा त्रास असल्यास जास्त प्रकाशात जाणे टाळावे, यामुळे जास्त वेदना होतात म्हणून कमी प्रकाशात जा किंवा चष्मा घाला.
 
5. डोक्यावर मालीश करा - मायग्रेनच्या वेदनेतून सुटकारा मिळविण्यासाठी डोकेच्या त्वचेवर मालीश करणे आणि मान स्ट्रेच करणे हे प्रभावी उपाय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती