गोमूत्राचे औषधी गुणधर्म

सोमवार, 17 जून 2019 (11:25 IST)
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोमूत्रातल्या गुणकारी घटकांमुळे गंभीर आजारही बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो. गोमूत्राचे सेवन लाभदायी ठरू शकते. गोमूत्रात जंतूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे गोमूत्रामुळे विविध जंतूंचा नाश होतो. जंतूंमुळे निर्माण होणारे आजार यामुळे बरे होऊ शकतात.
 
आयुर्वेदानुसार वित्त, वात आणि कफ दोषांचे असुंतलन विविध विकारांना कारणीभूत ठरते. या त्रिदोषांना नियंत्रणात ठेउन आणि बरे करण्याची क्षमता गोमूत्रात असते. त्यामुळे याच्या नियमित सेवनावर भर देण्यात आला आहे.
 
यकृताचे आरोग्य टिकवून ठेवण्यात गोमूत्राची महत्वाची भूमिका असते. यकृताच्या कार्यात बिघाड झाला तर अनेक विकारांना निमंत्रण मिळते. मात्र गोमूत्रामुळे यकृताला बळ मिळते आणि त्याचे कार्यही सुधारते.
 
गोमूत्रात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. गोमूत्राचे नियमित सेवन केले तर शरीराचा व्याधींपासून बचाव होतो. जंतूंशी लढण्यासाठी शरीर सक्षम बनते.
 
गोमूत्रात नैसर्गिक खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. शरीरातल्या खनिजांची कमतरता भरून काढणे यामुळे शक्य होते. गोमूत्रातून शरीराला आवश्यक ती पोषणमूल्ये मिळतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती