रांजणवाडी दूर करण्यासाठी घरगुती उपाय

रांजणवाडी म्हणजे काय ? 
रांजणवाडी हा डोळ्याच्या पापणीला येणारा छोटा फोड किंवा मुळाशी गाठ असलेला विकार आहे. यात पापणी सुजते. त्या ठिकाणी एक आधी एक बारीक पू असलेली पुळी येते. हा संसर्गजन्य विकार असून डोळ्याच्या पापणीला आतल्या बाजूने तो फोड येतो. यामुळे डोळा सतत ठुसठुसत राहतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते आणि पू गेल्यावर पूर्ण बरी होते. हे एका प्रकाराचे बॅक्टेरिअल इन्फेक्शन असून योग्य काळजी घेतल्याने आठवड्याभरात रांजणवाडी निघून जाते.
 
रांजणवाडीचे प्रकार
रांजणवाडी ही दोन पद्धतीने डोळ्यांवर येत असते. 
बाहेरील रांजणवाडी
ही पापण्यांच्या बाहेरच्या बाजूला येते. ही पुळी प्रमाणे सहज दिसून येते.
आतील रांजणवाडी
ही पापण्यांच्या आतील बाजूला येते. जी पापण्यांमध्ये तेलाचे निर्माण करणारी ग्रंथी च्या संसर्गामुळे येत. आतील रांजणवाडी जास्त त्रासदायक असते.
 
रांजणवाडी का होते? रांजणवाडी येण्याची कारणे
जीवाणूंच्या संसर्गामुळे
डोळ्यांची अस्वच्छता
सतत डोळ्यांना हात लावण्याची सवय
डोळे चोळण्याची सवय
डोळ्यांच्या कोरडेपणामुळे
असंतुलीत आहार
रोगप्रतिकार शक्ती कमी असणे
मधुमेह
प्रदूषित वातावरण
एकमेकांचा टॉवेल किंवा इतर वस्तू वापरल्याने
वारंवार विकार होत असल्यास चष्म्याचा नंबर आल्याची शक्यता
 
रांजणवाडी घरगुती उपाय
हा विकाराची सुरुवात असल्यास अगदी साधा उपाय म्हणजे कपड्याचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून किमान 5 वेळा शेकावे.
पापणीवर सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ आणि संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी जिरून जाते.
धण्याची पाण्याने अलगद डोळे धुतल्याने आराम मिळतो. यासाठी एक चमचा धणे पाण्यात उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यावर डोळ्यांना लावावे.
हळद भिजवून डोळ्यांना लावल्याने रांजणवाडीवर आराम मिळतो. हा लेप योग्य रीत्या लावणे आवश्यक आहे.
अगदी कमी प्रमाणात कोरफड गर लावल्याने जळजळ कमी होऊ शकते.
रांजणवाडीवर बटाट्याचा रस लावल्याने पुळी सुकण्यास मदत होते. याने ठुसठुसण्यावर ही आराम मिळतो.
पेरुचे ताजे पान कुटुन रांजणवाडीवर लावल्याने आराम मिळतो. दिवसातून एकदा जरी हा उपाय केला तरी आराम मिळतो.
 
Disclaimer: सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेबदुनिया या माहितीची जबाबदारी घेत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती