गर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

गर्भावस्थे दरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलवरीमध्ये होणार्‍या समस्येपासून आराम मिळतो आणि डिलवरीनंतर देखील प्रसूतीला होणारा त्रास कमी होतो.  
गर्भावस्थेत उलटी, मॉर्निंग सीकनेस आणि प्रसवमध्ये होणार्‍या त्रासाला शेवग्या खाल्ल्याने कमी केला जाऊ शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या  शेंगा खाण्याचे फायदे सांगत आहे.  
 
प्रसव : शेवग्या खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणार्‍या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रास देखील कमी होतो.  
 
मॉर्निंग सिकनेस : गर्भावस्थे दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर येण्या सारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात.  
 
स्वस्थ हाड : शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतं. ज्याने हाड मजबूत होतात. एवढंच नव्हे तर रक्त देखील 
साफ होत.  
 
संक्रमणापासून बचाव : एंटीबॅक्टीरियल असल्यामुळे शेवग्या गळा, त्वचा आणि छातीत होणार्‍या संक्रमणापासून बचाव करते.  
 
पोटाशी संबंधित त्रासांपासून बचाव : शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्याने जुलाब आणि कावीळ बरा होतो.
 
मधुमेहाला नियंत्रित करतो : शेवग्याचे पानं गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल आणि गर्भावधि मधुमेह जो नेमही गर्भवती महिलांना होत असतो त्यातून तुम्हाला नक्कीच सुटकारा मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती