Gulkand health benefits गुलकंदाचे आरोग्य लाभ जाणून घ्या

सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (20:31 IST)
गुलकंदाचे आरोग्य लाभ जाणून घ्या
भरपेट जेवल्यानंतर ते पचण्यासाठी म्हणून पान खाण्याचा रिवाज पूर्वी फार नेमाने पाळला जात असे. तो आता सणावाराशी निगडित असला तरीही पानातील एक घटक मात्र बहुतेकांच्या घरी आवर्जून आणला जातो. हा घटक म्हणजे गुलकंद. उत्तम चवीचा गुलकंद महिलांसाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदात पित्तदोषामुळे उत्पन्न होणार्‍या सर्व विकारांच्या उपचारासाठी गुलकंद सेवन करण्यास सांगितले जाते.
 
गुलकंद सेवन केल्याने थकवा, सुस्तपणा, खाज तसेच अंगदुखी आणि ज्वलनामुळे होणार्‍या आजारांमध्ये आराम पडतो. एवढेच नव्हे तर गुलकंदाचे सेवन केल्याने स्त्रियांना 5 मोठ्या समस्यांपासून आराम मिळतो.
 
गुलकंद सेवनाचे अनेक फायदे होतात.
अल्सर आणि सूज : 
गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. त्याशिवाय आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते. 
 
त्वचेसाठी उपयुक्त : 
त्वचेशी निगडित समस्यांमध्ये गुलकंदाचे सेवन केल्याचा फायदा होतो. त्वचेशी निगडित समस्या जसे डाग दूर होण्यास मदत होते. चेहर्‍याची सूज आणि डोळे लाल होणे कमी होते. तोंड येण्यावरही त्याचा ङ्खायदा होतो. 
 
मासिक पाळीमध्ये प्रभावी :
ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्त्राव होतो तसेच ल्युकोरिया सारख्या समस्या उद्‌भवतात त्यावर गुलकंद उपयु्क्त आहे. 
 
गुलकंदाचे सेवन कसे करावे :
गुलकंदाचे फायदे पाहिले तर दिवसातून 2 वेळा एक चमचा गुलकंद सेवन करायचे मग ते लस्सी, फळांचा रस, मिल्कशेक, आईस्क्रीम, गुलाब चहा या कोणत्याही प्रकारे करू शकतो.
 
चविष्ट गुलकंदाचे फायदे लक्षात घेऊन त्याचे नियमित सेवन आरोग्यदायी ठरू शकते; स्त्रियांनी याचे फायदे लक्षात घेऊन गुलकंदाचे सेवन जरूर करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती