हाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या

रविवार, 14 ऑक्टोबर 2018 (00:04 IST)
खरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी प्यायल्याने हाडांच्या अनेक समस्यांपासून आपण दूर राहू शकतो. हाडांच्या समस्यांपासून लांब राहायचे असल्यास ग्रीन टीला पर्याय नाही. एका संशोधनानुसार, पायांमध्ये सूज आली असल्यास, सलग दहा दिवस ग्रीन टी प्यायल्यास पायांची सूज कमी होते आणि पाय दुखणेही थांबते. आर्थराइटिसपासून होणारे ज्वॉईंट पेन, डॅमेज टिश्यू यांसाराख्या त्रासांपासून ग्रीन टी प्यायल्याने दूर राहता येते. आर्थराईटिस अँड रुमटालजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर लेखात म्हटले आहे की, हाडांमध्ये होणार्‍या गाठी अनेकदा किती औषधे घेतली, तरी काहीही फरक पडत नाही. मात्र, याच आजारावर ग्रीन टी हे उत्तम औषध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती