Benefit Of Cauliflower : फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (15:06 IST)
फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी आहे, याचा वापर फक्त भाजी बनविण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्यासाठी देखील केला जातो. याची भाजी जरी साधारण असली तरी या पासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
 
1 फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि लोहच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्यातच प्रमाणात तांबा असतो. फुलकोबी आपल्याला एकाच वेळी बरीच पोषकद्रव्ये मिळवून देतात.
 
2 रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ततेसाठी फुलकोबी खूप फायदेशीर आहे. या साठी आपण याला कच्चं सॅलडच्या रूपात किंवा याचे ज्यूस बनवून देखील घेऊ शकता. या दोन्ही पद्धती उत्तमरीत्या कार्य करतील.
 
3 सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी आणि गाजराचे रस सम प्रमाणात पिणं फायदेशीर असत. सलग तीन महिने त्याचे सेवन केल्यानं फायदेशीर असणार.
 
4 कोलायटिस, पोटदुखी किंवा पोटाशी निगडित इतर समस्यांमध्ये फुलकोबी फायदेशीर असते. तांदुळाच्या पाण्यात शिजवून याचा हिरव्या भागाचे सेवन केल्यानं पोटाच्या त्रासापासून सुटका होते.
 
5 यकृतामध्ये असलेले एंझाइम' ला सक्रिय करण्यामध्ये कोबीचे सेवन फायदेशीर असतं. याच्या सेवनामुळे लिव्हर योग्य प्रकारे कार्य करतं आणि शरीरातून विषारी घटकांना काढून टाकतं.
 
6 घशाचे त्रास जसं की घशा दुखणं, सूज येणं असल्यावर फुलकोबीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून प्यायलानं घशाचा समस्यांपासून फायदा मिळतो.
 
7 हिरड्यांमध्ये वेदना होणं, किंवा हिरड्यांमधून रक्त येणं सारखे त्रास असल्यास कोबीच्या पानाच्या रसाने गुळणे करावे. हे फायदेशीर ठरेल. फुलकोबी पॅराथायराइड ग्रंथीच्या व्यवस्थित कार्याची अमलबजावणीसाठी उपयुक्त आहे.
 
8 गरोदरपणात फुलकोबी फायदेशीर असते. ही फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असते आणि पेशींच्या वाढीसह हे गर्भात वाढणाऱ्या गर्भाला देखील फायदेशीर असते. फुलकोबी हे व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्रोत आहे. 
 
9 वजन कमी करण्यात देखील हे फायदेशीर आहेत. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी जास्तची चरबी कमी करण्यास मदत करते. त्या मधील असलेले फॉलेट लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करते. या मध्ये स्टार्च नसतं.
 
10 हे अँटी ऑक्सीडेन्ट तसेच कॅल्शियमने समृद्ध आहेत, जे मज्जासंस्थाला बळकट करतं. कॅल्शियम आपली हाडं आणि दात बळकट बनवत आणि शरीराच्या योग्य अमलबजावणीस मदत करतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती