World Heart Day 2020 : कोरोना काळात आपल्या हृदयाची या प्रकारे काळजी घ्या

मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:24 IST)
कोरोना काळात स्वतःला निरोगी ठेवणं हे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नाही, अश्या परिस्थितीत, सर्व लोकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. जेणे करून या विषाणूच्या संपर्कात येऊ नये. पण त्या लोकांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, जे कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत. आज आम्ही आपल्याला काही अश्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण आपल्या हृदयाला रोगांपासून वाचवू शकता. 
 
* मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा -
निरोगी राहण्यासाठी आणि आपल्या हृदयाला बळकट ठेवण्यासाठी आपल्या आहारातून मीठ आणि साखर काढून टाका. साखरेच्या जास्त सेवनानं मधुमेहाचा धोका वाढतो, आणि मिठाच्या जास्त सेवनानं रक्तात लोहाची कमतरता होते. हे दोन्ही हृदयासाठी योग्य नाही.
 
* वजन नियंत्रणात ठेवा - 
जर आपल्याला आपले हृदय तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असल्यास, तर सर्वात आधी आपल्याला आपले वजन नियंत्रित करणे गरजेचे आहे. या साठी आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जेणे करून आपले वजन नियंत्रणात राहील.
 
* ताण तणावाला दूर करा - 
मान्य आहे की आपल्या जीवनात फारच ताण तणाव आहे, जे आपल्याला रात्रंदिवस त्रास देत आहे. पण आपण विचार करा की जर का ताण घेतल्यानंच सर्व काही सुरळीत झालं असतं तर आज कोणाकडे काहीच ताण नसतं. म्हणून ताण आपल्यावर हावी होऊ देऊ नका. हे फक्त आणि फक्त आपल्याला आरोग्यावर वाईट परिणाम करतो. आणि आपण आजाराच्या आहारी जाता. जर आपण आपल्या हृदयाला निरोगी ठेवायचे असेल तर ताण तणावाला निरोप द्या, कारणं बहुतेक अश्या लोकांनाच हृदयविकाराचा झटका येतो, जे जास्त ताण तणाव घेतात. 
 
तज्ज्ञाचा मते आपण जेवढे अधिक ताण घ्याल, आपल्या शरीराला तेवढ्याच जास्त ताण तणावाच्या हार्मोन्सशी लढावे लागणार. ज्यामुळे आपले हृदय कमकुवत होणार आणि आपण हृदयाचे रोगी होणार. 
 
*मद्यपानापासून लांब राहावं - 
आपल्याला आपल्या हृदयाला निरोगी ठेवायचे असल्यास मद्यपानाच्या सेवनापासून लांब राहणं. हे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. जर आपण मद्यपानाचे सेवन करता, तर हृदय विकाराचा धोका वाढतो. 
 
* प्रोसेस्ड मांसाहार पासून लांब राहावं -
कोरोना काळात ठेवलेल्या मांसाहार आणि मांसापासून लांब राहणेच चांगले आहे. जर आपण कोरोना काळात 50 ग्रॅम देखील प्रोसेस्ड मीट खाता, तर असे करून आपण आपल्या हृदय विकारांना आमंत्रण देत आहात. म्हणून आपण या पासून लांबच राहावं.
 
* व्यायामाचा समावेश करावा -  
निरोगी जीवनासाठी व्यायामाला आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणं गरजेचे आहे, तर कोरोना कालावधीत आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे किती महत्त्वाचे आहे, हे कोणापासून लपलेले नाही, म्हणून आपल्या दैनंदिनी जीवनात व्यायामाचा आवर्जून समावेश करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती