आरोग्य थंडीतील...

शनिवार, 7 डिसेंबर 2019 (17:16 IST)
हिवाळा हा ऋतू आरोग्यदायी समजला जातो. पण प्रत्येक ऋतू कोणता ना कोणता आजार घेऊन येतोच. म्हणूनच प्रत्येक ऋतूमध्ये आजारांपासून दूर राहणं गरजेचं आहे. हिवाळ्यात होणार्‍या काही प्रमुख आजरांविषयी.. 
 
सर्दी पडसं- हा हिवाळ्यात नेहमी उद्‌भवणारा आजार आहे. वातावरणातले बदल हे या आजाराचं मुख्य कारण. हा आजार संसर्गजन्य असल्याने सर्दी-पडशाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीने गर्दीमध्ये जाणं टाळावं.
 
हायपोथर्मिया- हिवाळ्यामध्ये शरीराचं तापमान 34-35 अंश सेल्सियसपेक्षा कमी झालं तर हा त्रास होऊ शकतो. यामध्ये हात-पाय थंड पडतात, श्वसनाला त्रास होऊ लागतो. रक्तदाब अनियमित होऊ लागतो. यामध्ये अतिथंडीपासून वाचणं गरजेचं आहे.
 
टॉन्सिलाईटिस- हा आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. घशामध्ये तीव्रवेदना, ताप येणं ही लक्षणं दिसून येतात. हा त्रास जाणवत असेल तर थंड पदार्थांचं सेवन टाळा. 
 
अस्थमा- हिवाळ्यामध्ये अस्थमापीडित व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण हिवाळ्यातील धुक्यांमध्ये अ‍ॅलर्जी निर्माण करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे पीडित व्यक्तींनी या व्याधीपासून विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
 
कोरडी त्वचा- हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याची समस्या अनेकांना सतावते. अशा त्वचेवर भेगा पडून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी विशेष काळजी घ्यावी. 
 
मधुरा कुलकर्णी 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती