तोंडातून वास येणं बऱ्याच लोकांच्या साठी खूप वाईट अनुभव होऊ शकतो. कित्येकदा आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या तोंडातून वास येत आहे, आणि लोकं आपल्यापासून अंतर ठेवणं पसंत करतात. आणि जर एखादी व्यक्ती आपल्याला ती गोष्ट उघडपणे सांगते तर ते आपल्यासाठी फारच लज्जास्पद वाटते. जर आपल्या तोंडातून वास येत असेल तर त्यामागचे काही कारण आणि त्याचे सोपे उपाय जाणून घ्या.-
1 दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी त्यांचा कारणांना जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा काही विशेष खाद्य पदार्थांच्या सेवनाने किंवा काही आजार, तोंडाच्या वास येण्याचे कारण असू शकतात. याची माहिती ठेवा.
3 जास्त मसालेदार जेवण, कांदा, लसूण, अदरक, लवंग, काळी मिरीच्या सेवनाने तोंडाला वास येऊ शकतो. यांचा वापर कमी करावा आणि जेव्हा कराल त्यावेळी गुळणा करा किंवा दात घासून तोंड स्वच्छ करा.
7 बडी शोप, आसमंतारा(पिपरमेन्ट) वेलची, ज्येष्ठमध, भाजलेलं जिरं, धणे हे सर्व नैसर्गिक मुखवास(फ्रेशनर) आहे हे जेवणानंतर आणि इतर वेळेस देखील चघळत राहा. या मुळे तोंडाचा वास कमी होईल.