अंड्यातील कोणता भाग फायदेशीर?

थंडी सुरू होताच पहिली आठवण येते ती अंड्याची. थंडीत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रोटिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अंड्याच्या सेवनाला प्राधान्य दिलं जातं. पण आपण अंडी कशी खातात यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
 
* साधारणपणे थंडीत दररोज दोन अंडी खायला हवी.
* तज्ज्ञांच्या मते पंचविशीनंतर व्यक्तीची प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते म्हणून या वयात अंड्याचं सेवन फायदेशीर ठरतं.
*  चाळिशीनंतर आरोग्याप्रमाणे अंड्याचं सेवन करावं.
* वजन कमी करू इच्छित लोकांनी अंड्याचा पांढरा बलक सेवन करावा. पांढर्‍य भागात कॅलरीज पर्याप्त मात्रा असते.
* डीप फ्राय करून अंडी खाणारे जाडीला आमंत्रण देतात, कारण तळल्यानंतर त्यातील कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते. तसेच या क्रियेमध्ये अंड्यामधील पोषणमूल्य कमी होतं.
* अंड्यातील पूर्ण लाभ मिळवण्यासाठी अंडी फ्राय करून किंवा अती उकडून खाणं अयोग्य आहे. त्याऐवजी जरा वेळ उकडून किंवा हाफ फ्राय करून खाणे अधिक फलदायी ठरेल.
*  वजनाची काळजी नसणार्‍यांनी अंड्यातील पिवळा बलक अवश्य खावा. यामध्ये विविध व्हिटॅमिन्सची मात्रा असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती