केवळ लठ्ठपणाच नाही तर दुबळेपणा देखील धोकादायक आहे

शनिवार, 5 जानेवारी 2019 (00:57 IST)
लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याच्या नादात आपण दुबळेपणा स्वीकारला असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक होऊ शकतो. होय लठ्ठपणा प्रमाणे दुबळेपणा देखील धोकादायक आहे. निश्चितच, या दुबळेपणाच्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.
 
1. हाडांची कमतरता - दुबळ्या लोकांचे शरीर योग्यरीत्या पोषण शोषण्यास सक्षम नसत. अशा परिस्थितीत कॅल्शियम पुरेशा प्रमाणात नसल्याने हाडे मजबूत नसून अशक्त होतात.
 
2. रक्ताचा अभाव - दुबळ्या लोकांमध्ये रक्ताचा अभाव ही सर्वात सामान्य समस्या आहे. बर्‍याच वेळा रक्त तपासणीस देखील पुरेसे रक्त मिळत नाही.
 
3. ड्राय त्वचा - चरबी नसल्यामुळे त्वचेवर चमक दिसत नाही. त्वचेतील रुक्षपणा पोषण कमतरतेचा परिणाम आहे, ज्यामुळे शरीरातील चमक कमी होते. अशा प्रकारे, आपली त्वचा निर्जीव दिसते.
 
4. थकवा - शरीराला पुरेसे पोषण न मिळण्याने शक्ती देखील कमी होते आणि थोडीही कसरत केली तरी थकवा 
जाणवतो.
 
5. डिप्रेशन - दुबळेपणा फक्त शरीराशी संबंधित नसून मानसिक आरोग्याशी देखील संबंधित आहे. दुबळ्या लोकांमध्ये उदासीनतेची समस्या वेगाने पसरते.
 
6. मंद विकास - दुबळेपणा आपली शारीरिक वाढ मंद करतो कारण की दुबळ्या लोकांचे शरीर सामान्य शरीरासारखे पोषण शोषण्यास सक्षम नसतात.
 
7. लो इम्यूनिटी - सामान्य लोकांपेक्षा दुबळे लोक जास्त आजारी राहतात कारण त्यांच्यात प्रतिरोध क्षमता कमी होत जाते.
 
8. पोट आणि यकृत समस्या - दुबळ्या लोकांना लीव्हर समस्या किंवा त्यांच्याशी निगडित आजारांमुळे सामान्य शरीर असलेल्या लोकांपेक्षा जास्त धोका संभवतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती