Work from Home करतायं, मग या प्रकारे घ्या डोळ्यांची काळजी

गुरूवार, 7 मे 2020 (14:39 IST)
सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्व घरी बसूनच काम करत आहे. घरातून काम करताना डोळ्यांवर जास्त ताण पडतो. टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम. या मुळे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. या काळातच आपल्याला आपल्या डोळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्याचा काळात वैश्विक महामारी कोवीडने थैमान मांडले असताना सगळे सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहेत. अश्या स्थितीत डोळ्यांवर जास्त ताण पडत आहे. लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईल मध्ये डोळे घालून वाचावे लागते. त्यामुळे डोळ्यांवर जास्त ताण पडतो. अश्या मुळे डोळे लाल होणे, जळजळ होणे, पाणी येणे, खाज होणे सारख्या त्रासाला सामोरी जावे लागतं. 
 
लॅपटॉपच्या स्क्रीनला जास्त वेळ बघितल्यामुळे डोळ्यांना कोरडं पडते. यामुळे डोळ्यात खाज येणे, जळजळ होणे, डोळे दुखणे सारखे त्रास होतात. खाज येत असल्यास डोळे चोळले जातात त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी जास्त वाढू लागतो. लॅपटॉप वर काम करताना या गोष्टी लक्षात असू द्या. 
 
* डोळ्यांची उघडझाप करावी - 
ज्यावेळी आपण लॅपटॉप वर काम करतो तेव्हा आपले सर्व लक्ष्य लॅपटॉप वर असल्यामुळे आपण पापण्या उशीरा उघडझाप करतो. पापण्यांना लवकर लवकर उघडझाप केल्याने डोळ्यांवर ताण पडत नाही. पापण्या उघडझाप केल्याने डोळ्यांवर ल्युब्रिकंटचे थर नैसर्गिकरीत्या लागते. अशामुळे डोळ्यांना कोरडं पडत नाही. 
 
* लॅपटॉपची ब्राईटनेस मंद ठेवावी - 
जास्त करून लोकं लॅपटॉपची चमक वाढवून ठेवतात ज्यामुळे डोळ्यांना त्रास होतात. ज्यामुळे डोळे लाल होतात, डोळे दुखू लागतात, अश्या मुळे लॅपटॉप च्या ब्राईटनेसला संतुलित ठेवावे. या व्यतिरिक्त डिस्प्लेला पॉवर सेव्हिगं मोड मध्ये ठेवावे. अशामुळे डोळ्यांनाही त्रास होत नाही आणि लॅपटॉपची बॅटरी सुद्धा चांगली चालते.
 
* दर 15 मिनिटाने ब्रेक घ्यावा - 
लॅपटॉपवर काम करताना कामाच्या दर 15 मिनिटाने थोडी विश्रांती घ्यावी. आपले डोळे बंद करून बसावे. जेणे करून डोळ्यांवरचा ताण कमी होईल. 
 
* पोषक आहाराचा समावेश असावा -
आपल्या आहारामध्ये पोषक तत्त्वांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, फळांचे सेवन करावे. सध्या उन्हाळा असल्याने काकडी, कलिंगडाचे सेवन करावे. 
 
* पुरेशी झोप घ्यावी - 
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर काम करणाऱ्यांना डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. सध्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्तवेळ काम केल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. अश्या मुळे 7 -8 तासाची झोप घेणे गरजेचे आहे. 
 
* अँटीग्लेयर चष्मा वापरावा - 
लॅपटॉपवरून निघणाऱ्या रेडिएशनचा त्रास आपल्या डोळ्यांना होऊ नये या साठी अँटीग्लेयर चष्म्याचा वापर करावा.
 
* थंड पाणी डोळ्यांवर मारणे - 
काम झाल्यावर डोळे दुखत असल्यास डोळ्यांवर थंड पाणी शिंपडावे. जेणे करून आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतो तसेच डोळे लाल होत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती