Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

रविवार, 31 मे 2020 (11:22 IST)
रवी श्रीवास्तव 
 
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. आज आम्ही आपल्याला सायनसचे लक्षण आणि त्यावरील उपचारांबद्दल सांगत आहोत. ज्यामुळे बहुतांश लोकं त्रासलेले असतात. 
 
हा आजार सामान्य सर्दी पासून सुरु होतो. नंतर विषाणूजन्य व्हायरल किंवा फंगल संसर्गामुळे वाढतो. 
 
सायनसचा आजाराबद्दल लखनौमधील नाक, कान, घसा तज्ज्ञ विवेक वर्मा म्हणाले की सायनस हा नाकामध्ये होणारा आजार आहे. या रोगामध्ये नाकाचे हाडं वाढतं किंवा तिरकं होतं. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. जी व्यक्ती या समस्यामुळे ग्रसित असते त्यांना थंड वारं, धूळ, धूर, पासून त्रास जाणवतो.

डॉ. विवेक वर्मा म्हणाले की सायनस वास्तविक मानवी शरीराच्या कवटीत भरलेली कॅव्हिटी असते. ज्यामुळे आपल्या डोक्यात हलकीपणा आणि श्वासोच्छ्वास घेण्यास मदत होते. श्वास घेताना आत येणारी वायू या पिशवीमधून फुफ्फुसापर्यंत जाते. ही पिशवी हवे बरोबर येणारी घाण म्हणजेच धूळ, आणि इतर घाणेला प्रतिबंधित करते. ज्यावेळी माणसांचा सायनसचा मार्ग अवरुद्ध होतो, त्यावेळी थुंकी निघण्याचा मार्ग सुद्धा अवरुद्ध होतो. ज्यामुळे सायनोसायटिस नावाचा रोग होतो. यामुळे पडद्यावर(झिल्ली)मध्ये सूज येते. त्यामुळे पडद्यामध्ये भरलेली हवा कफाने भरून जाते आणि सायनस बंद होतात. अश्याने रुग्णाला त्रास होऊ लागतं.
 
डॉ. विवेक वर्मा म्हणाले की या आजाराचे मुख्य कारण पडद्यावरील सूज येणे आहे. ही सूज या कारणांमुळे देखील येऊ शकते -
 
1 विषाणू
2 फंगल संसर्ग 
3 किंवा नाकाचे हाड तिरकं झाल्यामुळे 
 
डॉ. विवेक यांने या आजाराचे काही विशेष लक्षणं सांगितले आहे ज्यांचा आधारे आपण या आजाराला सहजरित्या ओळखू शकता. 9 प्रमुख लक्षणे -
 
1 डोकं दुखणे
 
2 ताप येणे
 
3 नाकातून कफ स्त्राव होणे, नाक वाहणे
 
4 खोकला किंवा कफ दाटणे 
 
5 दातदुखी 
 
6 नाके वाटून पांढरा हिरवा किंवा पिवळे कफ पडणे 
 
7 चेहऱ्यावर सूज येणे 
 
8 कुठल्याही प्रकाराची गंध न येणे 
 
9 सायनसच्या जागी दाबल्यावर वेदना होणे. 
 
तपासणी : सायनसचा त्रास जरीही गंभीर नसला तरीही वेळेत औषधोपचार न केल्याने रुग्णाला त्रास सहन करावा लागतो. डॉ. विवेक वर्मा यांच्यामते रुग्णाला हा आजार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सिटी स्कॅन किंवा MRI च्या व्यतिरिक्त सायनसच्या इतर कारणांसह रक्ताची तपासणी केली जाते. जेणे करून आपल्याला या आजाराचे कारणं शोधता येतात.  
 
उपचार : सिटी स्कॅन आणि ऍलर्जीची तपासणी करून नाकाचे हाडं आणि सायनसचे आजार आढळ्यास घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. सध्याच्या काळात यांची शल्य क्रिया दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा नाकेची एन्डोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिये द्वारे केले जाऊ शकते. 
 
सायनसने त्रासलेल्या लोकांना धूळ आणि धुरांपासून वाचायला हवं. त्याच बरोबर आपण उकळत्या पाण्याची वाफ घेउन किंवा शेक देखील करू शकता. या दरम्यान पंखा आणि कुलर बंद करावं. वेळेवरच ह्या आजाराचे उपचार केले गेले नाही तर नंतर दम्यासारखे गंभीर आजार 
उद्भवू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती