उन्हाळ्यात फूड पॉइजनिंगपासून बचावासाठी 4 प्रभावी उपाय

उन्हाळ्यात बाहेरचं आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरतं. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात आणि यामुळेच फूड पॉइजनिंगचा त्रास उद्भवतो. अशात काही टिप्स लक्षात ठेवल्या तर यापासून वाचता येऊ शकतं. 
 
1. लिंबाचे सेवन
लिंबात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबेक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू पाणी पिण्याने बॅक्टेरिया मरतात. आपण रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिऊ शकता. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकतात. परंतू पाणी स्वच्छ असावे याची काळजी घेणे अती आवश्यक आहे.
 
2. तुळशीचे सेवन 
तुळशीत आढळणारे अँटीमिकोबियल गुणधर्म सूक्ष्मजीवांच्या समोरा जातात. तुळस अनेक प्रकारे आहारा सामील करता येईल. एका वाटीत दह्यात तुळशीचे पान, काळीमिरी आणि मीठ घालून सेवन करू शकता किंवा चहात तुळशीचे पान टाकून सेवन करू शकता.
 
3. दह्याचे सेवन 
दही एका प्रकारे अँटीबायोटिक आहे आणि यात जरा काळं मीठ घालून खाल्ल्याने आराम मिळेल.
 
4. लसणाचे सेवन 
लसणात अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 1-2 पाकळ्या पाण्यासह घेतल्याने आराम मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती