लिंबू पाणी पिणे हानीकारक आहे जाणून घ्या

मंगळवार, 8 जून 2021 (09:00 IST)
उन्हाचे तापमान आणखीन वाढू लागले आहे. उन्हाळ्यात लोकांनी बाहेर जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे. खूपच गरज असताना ते नक्कीच बाहेर जातात.काही लोक थंड वाटण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करतात.हे पेय तहान शमतो परंतु हे  शरीरासाठी हानिकारक आहे. कसे काय जाणून घेऊ या.
 
1 हाडांचे नुकसान करतो- लिंबू पाण्याचे सेवन करून चांगले वाटते. परंतु या मध्ये असलेले आम्ल हाडांना विरघळतात.या मुळे हाडे कमकुवत होतात.म्हणून ह्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
 
2 मायग्रेनची भीती- त्यात असलेल्या घटकामुळे तुम्हाला मायग्रेनची गंभीर समस्या होऊ  लागते. म्हणून लिंबू पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.
 
3 पोटात समस्या- बर्‍याचदा लोकांना जड अन्न खाल्ल्यानंतर लिंबूपाणी पिणे  आवडते, परंतु त्यामध्ये असणारे आम्लमुळे देखील पोटदुखी आणि जळजळ सारख्या समस्या होऊ शकतात.
 
4 दातांचे नुकसान- लिंबाच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो, म्हणून लिंबाचे काही थेंबच घाला.
 
5 छातीत जळजळ- लिंबाचे पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या लवकर होते. जेव्हा पोट ठीक नसते तेव्हा लिंबाचे पाणी प्या. त्यात असणारे आम्ल परत अन्ननलिकात जातात आणि या मुळे छातीत जळजळ होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती