झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर आजारांपासून मुक्ती

गुरूवार, 23 जानेवारी 2020 (11:56 IST)
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने 4 गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. 
 
आयुर्वेदानुसार दररोज अनोश्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या गंभीर आजारांपासून मुक्तता होते. आपल्या कडे बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर चहाची सवय असते. चहा न घेतल्याने पोटच साफ होत नाही, अशी त्यांना सवय जडलेली असते. पण सकाळी उठल्या उठल्या चहा घेतल्याने शरीरास नुकसान होते. पण सकाळी उठल्याबरोबर अनोश्या पोटी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यांवर त्याचा चांगला परिणाम होतो. 
 
आयुर्वेदामधून आपल्याला वेगवेगळ्या रोगांवर नैसर्गिक औषधाबद्दलची माहिती मिळून उपचार सापडते. नैसर्गिक असल्याने त्याचा काहीही दुष्परिणाम शरीरांवर होत नाही. ह्याच शृंखलेत आज आपणांस गुळाचे काही खास वैशिष्ट्य सांगत आहोत.
 
1 ) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो. ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून हे करावे. गॅस चा त्रास असणाऱ्यांनी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर गूळ खावा.
 
2 ) जर आपणांस संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी अनोश्या पोटी गूळ नक्की खावा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगर पण नियंत्रणात राहते. 
 
3 ) ज्यांना अन्न पचन सहज होत नाही त्यांच्या साठी गूळ आणि गरम पाणी हे रामबाण उपाय आहे. 
 
4 ) खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त सारख्या आजारांना सामोरा जावं लागतं. अशा वेळेस दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि अश्या आजारांपासून मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती