खानपानच्या 5 असंगत जोड्या, सेवन करताना काळजी घ्या

खाण्यापिण्याच्या भिन्न वस्तू आरोग्यासाठी वेग-वेगळ्याप्रकारे फायदा करतात. काही पदार्थ मिसळून खाल्ल्याने फायदा होतो तर काही पदार्थ असे आहेत जे सोबत खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतं. तर जाणून घ्या अशा 5 जोड्याबद्दल, ज्याचे सेवन टाळावे.
 
1 आंबा आणि काकडी -
उन्हाळ्यात आंबा आणि काकडी दोन्हीचे खूप सेवन केलं जातं परंतू जेवताना दोन्ही सोबत खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतं. आंबा एक फळ आहे तर काकडी भाजी म्हणून दोघांना पचनासाठी वेगवेगळ्या एनजाइम्सची गरज भासते, अशात दोन्ही सोबत खाल्ल्याने पचन संबंधी समस्या होऊ शकतात.
 
2 डेअरी प्रॉडक्ट्स आणि पालक -
पालकासह डेअरी प्रॉडक्ट्समध्ये पनीर मिसळून तयार भाजी लोकं चव घेऊन खातात. परंतू डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतं आणि पालकात आढळणारे ऑक्सॅलिक अॅसिड शरीराला कॅल्शियम अवशोषित करण्यापासून थांबवतो. ज्यामुळे हे पदार्थ सोबत खाल्ल्याने फायदा होत नाही.
 
3 दूध आणि डाळी -
अनेक पोषण विशेषज्ञाचे म्हणणे आहे की दुधाचे पचन पोटाऐवजी छोट्या इन्टेस्टाइनमध्ये होतं आणि डाळीने तयार कोणते हा पदार्थ शरीर वेगळ्याने पचवतो. अशात दोन्ही सोबत खाल्ल्याने पचन क्रियेची गती कमी होते.
 
4 दूध आणि अॅटीबायोटिक्स -
अँटीबायोटिक औषध दुधासोबत घेतल्याने औषधांचा प्रभाव पडत नाही असे मानले जाते. 
 
5 भोजनासह फिजी ड्रिंक्स -
फिजी व कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये अती प्रमाणात साखर असते. हे भोजनासह घेतल्याने पचन प्रणाली वाईट रित्या प्रभावित होते. याने पचन क्रियेची गती कमी होते आणि सोबतच गॅस व ब्लॉटिंग सारख्या समस्या उद्भवू लागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती