आरोग्य टीप - काय सांगता ओव्याने नुकसान देखील होऊ शकत

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (09:00 IST)
ओवा हा आरोग्यासाठी आणि चव येण्यासाठी वापरतात पण असं आवश्यक नाही की प्रत्येक परिस्थितीत हे आरोग्यासाठी फायदेशीर असेलच. ह्याच्या 5 नुकसान बद्दल जाणून घेऊ या .
 
1 आपण जर असा विचार करता की ओवा खाल्ल्याने पचन सुधारेल आणि आपण जास्त प्रमाणात ओवा खाता. तर हे माहिती असू द्या की जास्त ओवा खाल्ल्यानं ऍसिडिटी कमी होण्याऐवजी वाढू देखील शकते.
 
2 मर्यादित प्रमाणात ओवा फायदा करतो. पण ह्याचे अति सेवन केल्याने डोकेदुखी,उलटी,पोटात जळजळ सारखे त्रास उद्भवू शकतात.
 
3 ज्या बायकांना गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी त्या ओव्याचे सेवन करतात तर या स्थितीत ओव्याचे सेवन बाळासाठी देखील घातक होऊ शकत.
 
4 या शिवाय जास्त प्रमाणात ओवा खाल्ल्याने तोंडाची चव देखील बिघडते. ऍसिडिटी वाढते आणि तोंडात छाले देखील होऊ शकतात.
 
5 आपण पोटात अल्सर,तोंडाचे छाले,अंतर्गत रक्तस्रावापासून ग्रस्त आहात तर जास्त प्रमाणात ओवा खाणं या त्रासाला वाढवून आजारात वाढ करू शकत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती