थंडीतील फिटनेससाठी....

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:37 IST)
हिवाळ्यात व्यायामाच्या मदतीने तंदुरूस्त राहाण्यास मदत होऊ शकते. थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने सांध्याचे दुखणे, सूज, वेदना, संधिवात, सायटिका, दमा, मायग्रेन आणि इतर आजारांपासून सहजपणे सुटका मिळवता येते. रोज काही पावले चालण्याचा व्यायाम केल्यास कॅलरी कमी करण्यासाठी परिणामी वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ताणाच्या व्यायामांमुळे स्नायूंमध्ये आलेला ताण दूर होतो. नियमित ताणाचे व्यायाम केल्यास सांधेदुखी आणि स्नायूंची सक्रियता आणि गतिशीलता कायम राहाण्यास मदत होते.
 
थंडीच्या दिवसात पूश अप्स काढल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. शरीराला उष्णता देण्यास आणि तंदुरूस्त राखण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे आणि तो कुठेही करता येऊ शकतो. पूश अप्स करण्यासाठी सपाट जागेची निवड करावी. अशा जागेवर मॅट किंवा चटी घालावी. त्यामुळे अंगाला धूळ, कचरा लागत नाही. हिवाळ्यातही 
नियमित योग साणा केल्यास सर्वसाधारण आजार आपल्यापर्यंत फिरकणारही नाहीत. हिवाळ्यात अंग आखडते, ते मोकळे करण्यासाठी योगअभ्यासाची मदत होते. त्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे योग अभ्यास करावा.
 
व्यायाम करताना घाम तर येणारच. त्यासाठी घाम शोषून घेणारे कॉटन शर्ट किंवा बनियन जरूर घालावे. पाण्यामुळे तोंडातील ओलेपणा टिकून राहातो. त्यामुळे तहान लागो अथवा न लागो थोडे-थोडे पाणी पित राहावे. श्वसनक्रिया नियमित राखण्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यावा, 2-3 सेकंद श्वास रोखाना त्यानंतर तो हळुहळू सोडावा. हिवाळ्यात उबदार पांघरूणात उठावेसे वाटत नाही आणि मग आळशीपणा करून व्यायाम टाळण्याकडे कल असते. त्यासाठी हिवाळ्यात घराबाहेर पडून व्यायाम करणे टाळू शकतो. घरातच ट्रेडमिल किंवा इतर यंत्रांचा वापर करावा. 
मनोज शिंगाडे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती