दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

सोमवार, 1 एप्रिल 2024 (08:30 IST)
Health Tips : आजच्या काळात अनेकांना मधुमेह , हृदय रोग, सर्वाइकल, अस्थमा, लिव्हर आणि किडनीचे रोग यांसोबतच कर्करोग सारखे घातक आजार देखील होत आहे. सर्व प्रकारच्या गंभीर आजारांपासून स्वताला सुरक्षित ठेवायचे असल्यास आपल्या जीवनशैलीत या दहा नियमांचे पालन नक्की करा. 
 
या पदार्थांचा त्याग करा- चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, गहु, मैदा, तेल, साखर, पांढरे मीठ, अरारोट, मांस, मटन, दारू आणि सिगरेट इतर पदार्थांचा त्याग करावा.  
 
आरोग्यदायी राहण्यासाठी दहा नियम- 
1. इंटरमिटेंट फास्टिंग : उपवास करा 16 तासांचा. रात्रीच्या जेवणानंतर 16 तासांपर्यत काहीही खाऊ नका आणि पाण्याशिवाय काहीही पीऊ नका. 
 
2. पेय पदार्थ : आठवड्यातून एकदा एक ग्लास गोड सोडा लिंबाच्या रसासोबत सेवन करा. याशिवाय  वातावरण बघून तुती, द्राक्ष, बेल, कडुलिंब आणि इतर फळांचा रस प्यावा. 
 
3. सूर्य नमस्कार : प्रत्येक दिवशी योगासन करू शकत नसाल तर सूर्य नमस्कारालाच आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा. जर हे देखील जमत नसेल तर कमीतकमी सकाळी अर्धा तास कोवळ्या  उन्हात नक्की फिरावे.   
 
4. आहार : आपल्या आहारमध्ये दही, सलाद, डाळिंब, हिरव्या भाज्या, लसूण, घेवडा, फळ आणि ड्राय फूडचा उपयोग करा. जेवण झाल्यानंतर कमीतकमी एक तासानंतर जेवणच्या दरम्यान पाणी पिऊ नये.  
   
5. उन घेणे : प्रत्येक दिवशी सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहिल्याने सर्व प्रकारचे पोषक तत्व आणि विटामिनचे शरीरात प्रमाण वाढवते. 
 
6. तुळशीचे सेवन: नियमित पणे 4 पाने तुळशीचे सेवन करावे तसेच कढीपत्ता आणि कडुलिंबाचे पाने देखील आरोग्यासाठी चांगले असतात.  
 
7. पितळाचे भांडे : पितळाच्या ताटात जेवण आणि तांब्यामध्ये पाणी प्यायल्याने  आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच हे देखील पहावे की कुठल्या भांड्यांमध्ये आपण जेवण बनवत आहोत तसेच कसे शिजवत आहोत. 
 
8. शुद्ध वायु : सध्या वर्तमान काळात प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होत आहेत. अश्यावेळेस तोंडाला मास्क वापरावे व जेवढे शक्य होईल तेवढे प्रदूषणापासून दूर रहावे. तसेच पहाटे प्राणायाम करावे. जर तुमचे फुफ्फुस सक्रीय आणि मजबूत असतील तर तुम्ही अधिक  वर्ष जीवन जगण्याची क्षमता प्राप्त करू शकतात.  
 
9. तणाव : नैराश्य , तणाव हे मानसिक विकार असतील तर सर्व व्यर्थ आहे. कारण तुमचा तणावच तुम्हाला शारीरिक  रुपाने रोगी बनवतो. तणावाला दूर करण्यासाठी तुम्ही रोज 10 मिनिट ध्यान करू शकतात. 
 
10. वास्तु : जीवनात ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव पडो किंवा न पडो पण तुम्ही जिथे राहतात तेथील वातावरणाचा प्रभाव नक्कीच तुमच्यावर पडतो. असे काही घरे असतात की जे गर्मी असतांना थंडावा  प्रदान करतात तर असे काही घरे असतात जे थंडी  असतांना ऊब देतात. जर तुम्हाला एसी मध्ये रहायची सवय असेल तर या सवयीमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल.  तसेच घरात आणि घराच्या जवळपास कोणत्या प्रकारची झाडे आहेत तसेच घराची दिशा कशी आहे हे तपासून पहावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती