बाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी

मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (11:12 IST)
1 . दै‍नंदिन प्रावासातही वार्‍याचा त्रास अधिक होतो. वार्‍यामुळे डोळ्यांना इजा होत नाही, मात्र डोळे लाल होतात. डोळ्यांत धूळ, कचरा जाण्याची शक्यता असते. चष्म्याचाही फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी डोळे चोळू नयेत. पाण्याने स्वच्छ धुवावेत. गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
 
2. आजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास कॉम्प्युटरवर काम करू नये. मध्ये थोडी विश्रांती घ्यावी. कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे टक लावून पाहू नये. थोड्या थोड्या वेळाने डोळे मिचकावेत. लांबच्या वस्तूकडे पाहावे. कॉम्प्युटर स्क्रीन आपल्या नजरेपेक्षा वर असू नये. 
 
3. सतत सुरू असलेल्या एयरकंडिशनमुळे डोळे कोरडे पडतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार एसीचा त्रास होता. त्यामुळे सातत्याने एसीमध्ये बसणार्‍यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. 
 
4. जागरणांमुळे डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नसले तरी डोळे सुजणे, लाल होणे असा तात्पुरता त्रास होतो. यासाठी शीतोपचार करावेत. डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या, कोलन वॉटरच्या घड्या ठेवाव्यात... दुधासारखे थंड पदार्थ घ्यावेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती