हे टाळा, कोरोनाचा धोका टळेल, संसर्गाचा धोका होईल कमी

मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (09:59 IST)
सध्या सगळीकडे कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात दररोज नवीन प्रकरणे येत आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. रोग प्रतिकारक शक्ती बळकट असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतं. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगत आहोत की आपल्याला कोरोनापासून वाचण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी टाळण्याची गरज आहे. या गोष्टींचा अधिक सेवन केल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. चला तर मग जाणून घ्या की कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे.
 
* जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये - 
मिठाचं जास्त सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी जास्त प्रमाणात मीठ खाणं टाळावं. आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी कमी प्रमाणात मीठ खावं.
 
* चहा आणि कॉफीचे जास्त सेवन करणं टाळावं -
चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. चहा आणि कॉफीत कॅफिन जास्त प्रमाणात आढळतं आणि मोठ्या प्रमाणात कॅफीनचा सेवन केल्यानं आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
 
* एनर्जी ड्रिंक्स - 
एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. कोरोना काळात एनर्जी ड्रिंक्सच्या वापर करणं टाळावं. एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनानं आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो.
 
* गोड वस्तू खाणं टाळावं -
जास्त प्रमाणात गोड खाणं टाळावं. जास्त गोड खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. गोड गोष्टींचा सेवन मर्यादितच करावं. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यानं आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते.
 
* मद्यपान करणं टाळा - 
मद्यपानाचे सेवन केल्यानं आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. मद्यपान केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मद्यपान करणं टाळावं.
 
* हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी आहे, आपल्याला काही आजार असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती