चुकीच्या पद्धतीने मास्क घालणे ठरु शकतं प्राणघातक

गुरूवार, 2 जुलै 2020 (07:36 IST)
सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सांगितलेल्या मार्गदर्शनाच्या यादीत मास्क लावणं अनिवार्य सांगितलेलं आहे. लोकांकडून या सूचन पाळल्या देखील जात आहे. लोक घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क देखील आवर्जून लावत आहे. जेणे करून त्यांचे कोरोना व्हायरस पासून रक्षण होऊ शकेल. 

परंतू काही लोक असे देखील आहे ज्यांना हे माहित नाही की मास्क कसे घालावे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्याने आपल्याला नुकसान होऊ शकतो. बऱ्याच लोकांना मास्क घालण्याची पद्धत माहीतच नसते. ज्यामुळे त्यांना जीवानिशी जावं लागतं. मास्क लावण्यापूर्वी आपण खालील दिलेल्या गोष्टींना पाळावं आणि या नियमानुसारच मास्क घालावा.
 
1 चेहऱ्याला स्वच्छ करावं : 
मास्क घालण्याच्या पूर्वी आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करावं चेहरा स्वच्छ केल्यावर चांगल्या गुणवत्तेचं मॉइश्चराइझर लावावं. मॉइश्चराइझर लावण्यापूर्वी आपले हाथ स्वच्छ धुवून घ्या. नंतर आपल्या चेहऱ्यावर मास्क लावा. मॉईश्चराइझर लावल्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता नाहीशी होते. 
 
2 मेकअप कमी लावा : 
बरेचशे लोकं मेकअप केल्यावर मास्क घालतात जे चुकीचं आहे. आपण प्रयत्न करा की आपल्या चेहऱ्यावर मास्क घालताना मेकअप नसावं. कारण मास्क घालून मेकअप तोंडात जाऊ शकतं जे आपल्यासाठी धोक्याचे ठरेल. त्याचबरोबर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून मेकअप करणे टाळावे. 
 
3 चांगल्या कापड्याने मास्क बनवावा:
सध्या बाजारपेठेत बऱ्याच प्रकाराचे मास्क मिळत आहे, पण आपण फक्त तेच मास्क विकत घ्या जे सुती कापड्याने बनविले आहे. या व्यतिरिक्त अजून कोणत्याही कापड्याची मास्क घालू नये.
 
4 जास्त काळ मास्क घालू नये : 
मास्क जास्त काळ घालू नये. वेळोवेळी हे काढावं. बरेचशे लोकं मास्क घालूनच ठेवतात जे आरोग्यास हानिकारक असत. आपण अशी चूक करू नका आणि थोड्या-थोड्या वेळात मास्क काढत राहा. परंतू गर्दी नसावी अशा वेळेस मास्कपासून विश्रांती घेता येईल. गर्दीत मास्क काढण्याची चूक करु नका. 
 
5 मास्क काढल्यावर चेहरा स्वच्छ करा : 
मास्क काढल्यावर आपल्या चेहऱ्याला फेसवॉश किंवा क्लिन्जरने स्वच्छ करा. त्यानंतर सौम्य मॉइश्चराइझर आपल्या चेहऱ्याला लावा. आपले हात साबणाने स्वच्छ करावे.
 
6 मास्क स्वच्छ करावं : 
घरी आल्यावर आपल्या मास्क चांगल्या प्रकारे स्वच्छ करावं. मास्क काढल्यावर त्याला साबणाने स्वच्छ करुन उन्हात वाळवावा. लक्षात असू द्या की नेहमीच मास्क स्वच्छ केल्यावरच वापरा. असं केल्याने मास्क वर लागलेली माती आणि धुळीचे कण निघून जातात.
 
या गोष्टी लक्षात असू द्या -
* मॉर्निंग वॉक करताना मास्क घालू नये. असे केल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
* व्यायाम किंवा काही काम करताना मास्क घालू नये.
* कोणाचा ही मास्क वापरू नये किंवा आपले मास्क कोणास ही देऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती