जांभळाचे फायदे आपल्याला माहित आहेत का?

शुक्रवार, 10 जुलै 2020 (08:42 IST)
जांभळाच वैज्ञानिक नाव सिजीगियम क्युमिनी आहे. जांभूळ हे अम्लीय प्रकृतीचं फळ आहे. पण चवीला हे गोड असतं. हंगामी फळ खाण्यात तर चविष्ट असल्याच्या बरोबरच बरेच औषधीय गुणधर्म घेतलेलं असतं. जांभळात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भरपूर आढळतं.
 
फायदे :
* पचनास जांभळं फायदेशीर असतं. जांभळं खाल्याने पोटाशी निगडित बरेचशे त्रास दूर होतात.
* मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळं एक रामबाण फळ आहे. जांभळाच्या बियांची भुकटी किंवा पावडर मधुमेहावर फायदेशीर आहे.
* जांभळाच्या बियांची भुकटी करून पाणी किंवा दह्याबरोबर घेणे मूतखडा आजारावर फायदेशीर आहे.
* दात आणि हिरड्यांशी निगडित बऱ्याच त्रासांना दूर करण्यासाठी जांभूळ फायदेशीर असतं.
* संधिवाताच्या उपचारासाठी देखील जांभूळ उपयुक्त आहे. ह्याचा झाडांच्या सालीला उकळवून वाचलेल्या घोळाचा लेप गुडघ्यांवर लावल्याने संधिवाताच्या त्रासेतून आराम मिळतं.
* जांभळाचा रस, मध, आवळा किंवा गुलाबांच्या फुलाचे रस समप्रमाणात मिसळून सकाळच्या वेळी सेवन केल्याने रक्ताची कमी आणि अशक्तपणा दूर होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती