कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अंगीकार करा

रविवार, 17 मे 2020 (08:48 IST)
सध्याच्या काळात कोरोनाने थैमान मांडले आहे. बघता बघता या महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. आपण काही बारीक गोष्टींकडे लक्ष्य दिले तर आपण सुरक्षित राहू शकतो. 
 
काही सावधगिरी बाळगून आपण याच्या संसर्गापासून वाचू शकतो. त्यासाठी ह्या सवयींना आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करायला हव्या. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहे त्या सवयी......
 
1 बाजार पेठेमधून आलेल्या नोटांना थुंकी लावून मोजणे टाळा. आलेल्या नोटांना जमल्यास तीन दिवस वापरू नका. गरज असल्यास प्रेस करू शकता.
 
2 कच्च्या भाज्यांचा वापर सॅलड रूपाने करणं टाळावे. काही दिवसांसाठी कोथिंबीर आणि पालेभाज्या खाणं टाळावं.
 
3 भाजी चिरताना भाजीपाला सर्वदूर पसरवून चिरू नका आणि ज्या भांड्यात भाजी ठेवली गेली आहे ते भांडं, सुरी आणि आपले हात स्वच्छ साबणाने धुऊन घ्या. शक्य असल्यास कोरड्या भाज्या खाव्या.
 
4  कुठे ही बाहेर जाऊ नका, आणि बाहेर बसू ही नका. बाहेर कुठल्याही वस्तूंना स्पर्श करणे टाळावं.
 
5 घराच्या बाहेर पडल्यास बाहेरून घरी आल्यावर आपल्या पादत्राणांना किमान 20 सेकंड चोळून चोळून साबणाच्या पाण्याने धुवावे. नंतर आपले हात घराच्या बाहेरच स्वच्छ करावं. कारण रस्त्यावरही संसर्ग असू शकतं.
 
6 बराच वेळ बाहेर गेले असल्यास घरी आल्यावर आपले हात- पाय चांगले धुवा. सरळ स्नानगृहात जाऊन सर्व कापडी साबणाचा कोमट पाण्यात भिजवून ठेवा मगच अंघोळ करा. 
 
7 बाहेर जाताना मोबाईल प्लास्टिकच्या पिशवी मध्ये घेऊन जाणे, नंतर ती पिशवी फेकून द्यावी. बाहेर मोबाईल हाताळू नका. गरज असल्यास स्पीकर वर टाकून संभाषण करा. 
 
8 गॅस सिलेंडर आला असल्यास त्याला 4 ,5 दिवस हात लावू नका.
 
9 कोणाशी बोलत असताना थुंकी उडतेच, म्हणून नेहमी मास्कचा वापरच करावं, डोळ्यावर चष्मा असू द्यावा.
 
10 एकमेकांशी बोलताना- भेटताना अंतर राखून बोला भेटा.
 
11 मास्कसाठी सुती कापड्याचा वापर करावा. जेणे करून त्याला दररोज धुणे सोपं पडेल.
 
12 बाहेरून आलेली प्रत्येक वस्तूंना स्पर्श करणं टाळावे. प्लास्टिक पॅकबंद असलेल्या वस्तूंना साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे. किंवा गरम पाण्यात खायचा सोडा टाकून धुणे.
 
13 फळवाले, भाजीवाल्यांचा गाडीपासून लांब राहणे.
 
14 बाहेर जाताना मास्क आणि चष्म्याचा वापर करावा.
 
15 गूळ, सुंठ, तुळस, काळे मिरे, बेदाणे आणि दालचिनीचा काढा बनवून प्यावे. तसेच हळद आणि दुधाचे सेवन नियमाने करणे.
 
16 सर्व मसाले आणि हिंगाचा वापर अन्न शिजवताना आवर्जून करावं. 
 
या सर्व गोष्टींचे आपण अनुसरण केल्यास आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहू शकाल. असावधगिरी केल्यास त्याचा परिणाम काहीही असू शकतो. निष्काळजीपणाने राहू नका, वावरू नका. अती आत्मविश्वासाने राहणे आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी घातक होऊ शकतं . वरील गोष्टीचे पालन स्वतः करा आणि आपल्या आप्तेष्ठीयांना करण्यास ही सांगा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती