काय म्हणता ? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोनाचा धोका वाढतो

शनिवार, 9 मे 2020 (15:24 IST)
शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढतो. एवढच नव्हे तर व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी झाल्याने कोरोना रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो. २० युरोपियन देशांवर नुकत्याच झालेल्या संशोधनात हे उघड झालं आहे. अँगलिया रस्किन विद्यापीठ आणि क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
 
पूर्वीच्या संशोधनात कमी प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि श्वसन रोगांचे गंभीर संबंध आढळले आहेत. व्हिटॅमिन डी पांढर्‍या रक्त पेशींच्या प्रतिक्रियांना नियंत्रण करतो, ज्यामुळे अधिक सूज निर्णाण करणाऱ्या सायटोकिन्स सोडण्यास प्रतिबंधित करते. कोरोना विषाणूंमुळे सूज निर्णाण करणाऱ्या साइटोकिन्स जास्त प्रमाणात निर्णाण होतात.
 
नवीन संशोधनात असं आढळले आहे की इटली आणि स्पेनमधील सरासरी व्हिटॅमिन डीची पातळी इतर युरोपियन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ज्यामुळे या देशांमध्ये कोविड-१९ संबंधित मृत्यू जास्त आहेत. दक्षिण युरोपमधील लोक कडक उन्हापासून बचाव करतात. उत्तर युरोपमधील व्हिटॅमिन डीच्या उच्च सरासरी पातळीचे कारण उन्हात अधिक बसणं आणि कोड लिव्हर ऑइल वापरणं आहे. “व्हिटॅमिन डीची सरासरी पातळी आणि कोविड-१९ संसर्ग आणि मृत्युदर यांच्यात संबंध आहे,” असं संशोधन करणारे डॉक्टर ली स्मिथ यांनी सांगितलं. ज्या वृद्धांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, त्यांच्यावर कोविड-१९ चा तीव्र परिणाम होत आहे. या प्रकरणात, कोविड-१९ च्या उपचार दरम्यान व्हिटॅमिन डी पूरक आहारांचा वापर केला पाहिजे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती