...म्हणून होते अ‍ॅसिडिटी

बुधवार, 1 जुलै 2020 (19:24 IST)
आजकाल अ‍ॅसिडिटीच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. परंतु केवळ पित्त प्रकृतीच्या व्य्रतींनाच अ‍ॅसिडिटी होते किंवा शरीरातील पित्त वाढले म्हणजे अ‍ॅसिडिटी सुरू असे नव्हे, तर आहाराचे वेळापत्रक न पाळल्यामुळेही प्रकृती बिघडून अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो. पचन न होता जठरातील अन्न तेथेच पडून राहिल्याने पचनासाठी
आवश्यक असलेले पित्त निर्मितीचे कार्य बिघडते. त्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही आणि आणखी पित्त निर्माण होते.
 
या अवस्थेतही अन्न घेतले गेल्याने नियंत्रित पित्तनिर्मितीचे शरीरातील नैसर्गिक कार्य बिघडते आणि शरीर अ‍ॅसिडिटी विकाराला बळी पडते. शारीरिक त्रासामागे अ‍ॅसिडिटी हे एक कारण असल्याचे सध्या समोर आले आहे. अशा प्रकारच्या अ‍ॅसिडिटीला स्वयंनिर्मितअ‍ॅसिडिटी असे संबोधले जाते. कारण संबंधित व्य्रती ही पित्त प्रकृतीची नसली तरी अ‍ॅसिडिटीला बळी पडते. सधची जीवनशैलीच या प्रकारच्या अ‍ॅसिडिटीला कारणीभूत आहे. 
 
मोठ्या शहरांमध्ये आणि कॉर्पो रेट कंपन्यांमध्ये कर्मचारी दिवसभर टेबलवर बसून संगणकावर काम करत असतात. भरपेट जेवण आणि चहाकॉफी-फास्टफूडचा भडीमार सहन करताना एक दिवस जठराचे कार्य बिघडायला सुरूवात होते. प्राथमिक लक्षणे दिसत असूनही आहारात बदल न झाल्यामुळे नियंत्रित पित्तनिर्मितीचा
नैसर्गिक स्वभावधर्म बदलतो आणि शरीरात अनावश्यक पित्तनिर्मितीला सुरूवात होते.
 
स्वयंनिर्मित अ‍ॅसिडिटी विकारात शरीरातील अनावश्यक पित्त उलटी किंवा जुलाबावाटे बाहेर काढणे महत्त्वाचे असते. पंचकर्मातील विरेचन क्रिया त्यासाठी उपयु्रत ठरते. तेव्हा सुरूवातीला स्वयंनिर्मित अ‍ॅसिडिटीची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करायला हवेत.

प्राजक्ता जोरी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती