सावधान / गर्भवती महिलांना डासांचा (मच्छर) त्रास जास्त होतो

पावसाळा आला की मोसम तर चांगला होतोच पण त्यासोबत आजारांचा धोका ही वाढून जातो. तसेच मच्छरांमुळे आजारपण येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या मोसमात यांच्यापासून बचाव करणे फारच गरजेचे आहे. डासांचा बचाव करण्यासाठी लोक काही घरगुती उपचारांसोबत नवं नवीन तंत्रज्ञान वापर देखील करतात. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की मच्छर काही लोकांना जरा जास्तीत चावतात.
 
कोणत्या लोकांना मच्छर जास्त चावतात - 
 
- बर्‍याच रिपोर्ट्सनुसार मच्छर एक खास ब्लड ग्रुप असणार्‍या व्यक्तींना जास्त चावतात आणि रिसर्चमध्ये समोर आले आहे की मच्छर 'ओ ब्लड ग्रुपकडे जास्त आकर्षित होतात.
 
- बर्‍याच वेळा लोक आणि रिसर्चनुसार असे मानण्यात आले आहे की ले गेले आहे की जे लोक जस्त बियरचे सेवन करतात त्यांना जास्त मच्छर चावतात. पण अद्याप   पूर्णपणे कुठल्याही रिसर्चमध्ये याची पुष्टी झालेली नाही आहे.
 
- ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना मच्छर जास्त चावतात, कारण घामामध्ये लॅक्टिक ऍसिड, यूरिक ऍसिड, अमोनिया इत्यादी असतात, ज्यामुळे मच्छर जास्त आकर्षित होतात.
 
- गर्भवती स्त्रिया इतर महिलांच्या तुलनेत जास्त खोल श्वास घेतात आणि या दरम्यान त्यांच्या शरीरातील तापमान जास्त होतो. यामुळे गर्भवती स्त्रियांना डास जास्त चावतात.   
 
- फीमेल अर्थात मादा मच्छराला जिवंत राहण्यासाठी आइसोल्युसिनची गरज असते. यामुळे ज्या लोकांच्या शरीरात आइसोल्युसिन जास्त असत, त्यांना डास जास्त त्रास देतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती