हृदयरोगाचे निदान झाले सोपे

मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (08:56 IST)
हृदयरोग निदानाची अत्यंत वेगवान आणि सुरक्षित पद्धत विकसित करण्यात आली आहे. हृदयरोगाची लक्षणे दिसताच अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या रुग्णाचे निदान करण्यास ती अत्यंत उपयुक्‍त ठरणार आहे.
 
कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये (सीएमएजे) नव्या हृदयरोग निदान पद्धतीचा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णाला हृदयघाताचा कितपत धोका संभवतो, याचाही अंदाज साधे लॅब स्कोअर घेणार आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जर्मनी या चार देशांच्या संशोधकांच्या आंतररराष्ट्रीय चमूने ही पद्धत विकसित केली आहे. कॅनडाच्या ओन्टॅरिओ येथील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधक डॉ. पीटर कावसाक यांनी म्हटले आहे की, प्रचलित हृदयरोग निदान पद्धतीपेक्षा नव्याने विकसित करण्यात आलेली साधे लॅब स्कोअर पद्धत अत्यंत उपयुक्‍त असून, अतिदक्षता विभागात भरती हृदयरोग्याच्या रक्‍तचाचण्या अत्यल्प वेळामध्ये घेण्यास मदत करते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती