तपासा तुमची ऑक्सिजन पातळी

शनिवार, 24 एप्रिल 2021 (16:07 IST)
चाचणी कोणी करावी? - ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणार्याि  व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
 
अशी करावी चाचणी - चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसाच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. हे चालणे सपाट जमिनीवर असावे. पायर्यांकवर चालू नये. तसेच चालताना अतिवेगाने किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर  तब्येत उत्तम असे समजावे. ऑक्सिजन एक-दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
 
चाचणीचा निष्कर्ष - जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करणपूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल, तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्या जागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये. 60 वर्षांहून अधिक वयाचे व्यक्ती 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.
सत्यजित दुर्वेकर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती