खेळात चांगली कारकिर्दी करण्यासाठी टिप्स

शनिवार, 27 मार्च 2021 (08:00 IST)
खेळात आपली कामगिरी सुधारण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे खेळात आपलं प्रदर्शन सुधारेल आणि यश नक्की मिळेल. 
 
* योग्य पोषण- खेळात शारीरिक श्रम भरपूर करावे लागतात. आपण बऱ्याच वेळ  मैदानावर टिकून राहावे असे वाटत असेल तर या साठी शरीरात ऊर्जा असावी आणि ऊर्जा मिळण्यासाठी योग्य आहार मिळणे महत्वाचे आहे. आपल्याला ऊर्जा वसायुक्त अन्न आणि कार्बोहायड्रेटयुक्त अन्नापासून मिळते.म्हणूनच आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दूध, अंडी, चीज, अंकुरलेले बियाणे इत्यादी प्रथिनेयुक्त पदार्थ खावे. जेणे करून आपला शारीरिक विकास योग्य होईल आणि आपण खेळात उत्तम कामगिरी करू शकाल. 
 
* सराव आणि प्रशिक्षण- आपण जितका अधिक सराव कराल, खेळात अधिक  चांगले व्हाल. खेळाच्या मैदानात चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सराव करावे लागणार. खेळाच्या ज्या क्षेत्रात कमकुवत आहात त्या पक्षाला मजबूत करा आणि नियमाने सराव करा. एकाद्या चांगल्या शिक्षकांकडून प्रशिक्षण घ्या. जेणे करून त्या खेळातील बारकावे समजतील. 
 
* शिस्त- खेळाडू ने शिस्तबद्ध असणे महत्तवाचे आहे. शिस्तबद्ध जीवनशैली शिवाय आपण उत्तम खेळाडू होऊ शकत नाही. आयुष्यात शिस्तबद्धता असणे महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये शिस्तीचे पालन करावे. सराव नियमित आणि कडक करा. प्रत्येक काम वेळीच करा. आहारामध्ये देखील अनुशासन ठेवा. असं केल्याने आपण खेळामध्ये चांगली कामगिरी करू शकाल.     
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती