अमावास्येला काय करावे-काय करू नये?

अमावास्येला काय कराव

* ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधी समस्या असतील किंवा ज्या दंपतीने आपले मुल जन्मानंतर काही काळातच गमवले असतील त्यांनी दर अमावास्येला पाच, अकरा किंवा एकवीस लीटर दूध दान करावे. दूध अविवाहित कन्या किंवा रोगींना वितरित केल्यास अधिक पुण्य मिळेल. याने संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्य वाढतं.
 
* व्यवसायात नुकसान होत असल्यास किंवा कारखान्यात सतत काही अपघात होत असल्यास पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे. यानंतर पक्ष्यांना दाणा टाकायला हवा.
* वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावास्येला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गूळ चढवावे. मुंग्यांच्या वारुळावर विष्ठा-मूत्र त्याग, किंवा पाणी टाकणे टाळावे.
 
* अमावास्येची रात्र पितृ देवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालीसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा. 

अमावास्येला काय करू नये

* अमावास्येला दारावर आलेल्या भिकार्‍याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यशाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे.
 
* अमावास्येला कोणत्याही प्रकाराच्या तामसिक वस्तूंचे सेवन टाळावे.
* अमावास्येला कोणत्याही प्रकाराचा नशा करू नये.
 
* याव्यतिरिक्त चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे.
 
* अमावास्येला कटु वचन बोलणे टाळावे. 

वेबदुनिया वर वाचा