Astro Tips : तुळशीचे अचूक ज्योतिष उपाय

तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात. स्त्रियांनी त्या तुळशीला पाणी घालावे, प्रदक्षिणा घालाव्यात, पूजा करावी, रांगोळी काढावी व सायंकाळी दिवा लावावा. श्रीविष्णूला तुळस प्रिय आहे. 
 
तुळशीच्या पानाने त्याची पूजा केली असता पुष्कळ व्रते, यज्ञ, जप केल्याचे फळ लाभते. दरवर्षी कार्तिक शुद्ध व्दादाशीस तुळशीविवाह करावा. तुळस पूजनाने प्रसन्नता लाभते. आणि त्यामुळेच घरातील वातावरण देखील शुद्ध आणि सात्त्विक राहते. 
 
3 . जर तुम्हाला मालामाल व्हायचे असेल तर घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूने तुळशीचे रोप लावायला पाहिजे. रोज तुळशीची योग्य देखरेख केली पाहिजे. हे उपाय केल्याने घरात पैसा येऊ लागतो आणि पैशाची तंगी संपते. दाराच्या दोन्ही बाजूने तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.    
 
4 . रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला पाहिजे. या उपायाने महालक्ष्मी प्रसन्न होते.   
 
5 . रोज सकाळी तुळशीला जल चढवायला पाहिजे. तुळशीची देखरेख केली पाहिजे. हा उपाय केल्याने आरोग्य उत्तम राहत आणि देवी देवतांची कृपा देखील तुम्हाला मिळते.  
 
6. जर एखादा व्यक्ती तुळशीची माळा धारण करतो तर त्याला सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते. अशा लोकांना कोणाची वाईट नजर लागत नाही. तसेच, नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील त्यांच्यावर पडत नाही.  
 
7. प्रात: तुळशीच्या रोपापुढे अशुभ स्वप्न सांगितले तर त्याचे दुष्फळ समाप्त होऊन जातात.  
 
8.  जर एखाद्याची संतानं फार जिद्दी असेल, मोठ्यांचे म्हणणे ऐकतं नसेल तर त्याला पूर्व दिशेकडे ठेवलेल्या तुळशीचे तीन पान रविवारी सोडून रोज खायला दिले पाहिजे, संतानचा व्यवहार सुधारायला लागेल.  
 
9. जर कन्येचा विवाह नसेल होत तर कन्येने तुळशीच्या झाडाला घराच्या दक्षिण-पूर्वदिशेत ठेवून नियमित रूपेण जल अर्पण करायला पाहिजे. ज्याने कन्येला लवकरच योग्य वरची प्राप्ती होते.  
 
10. तुलशीचे रोप किचनजवळ ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये आपसातील प्रेम, सामंजस्य सदैव कायम राहत.  
 
11. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये तुळशीचे आठ नाव सांगण्यात आले आहे - वृंदा, वृंदावनी, विश्व पूजिता, विश्व पावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळशी आणि कृष्ण जीवनी. सकाळी जल चढवताना यांचे नाव नेमाने घेतल्याने जातकाला जीवनात कुठलेही संकट येत नाही. त्याला सर्व प्रकारांच्या भौतिक सुख सुविधांची प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती