शनी धनू राशीत बदलेल चाल, या राशींवर होईल शुभ-अशुभ प्रभाव

शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (14:53 IST)
सप्टेंबरचा महिना ग्रह नक्षत्रांच्या बदलांसाठी फारच महत्त्वाचा आहे. बुधवार 18 सप्टेंबर रोजी ग्रहांचे न्यायाधीश आणि व्यक्तीला कर्मांच्या आधारावर फळ देणारे शनी आपली चाल बदलणार आहे. शनी सध्या धनू राशीत वक्री अवस्थेत गोचरामध्ये आहे. येणार्‍या 18 सप्टेंबर रोजी शनी धनू राशीत वक्रीतून मार्गी होणार आहे. शनी जे धनू राशीत उलटे चालत आहे होते ते 18 सप्टेंबरपासून सरळ चालतील. शनीला सरळ होणे शुभ मानले जाते.  
 
मार्गी शनीचे प्रभाव  
राहू केतू ह्या दोन ग्रहाला सोडून 18 सप्टेंबर रोजी सर्व ग्रह मार्गी राहणार आहे. शनीचे मार्गी झाल्याने खास करून मेष आणि सिंह राशीचं लोकांसाठी सुखद समाचार मिळेल.  
 
या राशींसाठी उत्तम 
शनीचे 18 सप्टेंबरपासून धनू राशीत मार्गी होत असल्याने मेष, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना लाभ मिळेल. जे कामं अडकलेले होते ते पूर्ण होतील. कुठून शुभ वार्ता ऐकायला मिळेल ज्याची बर्‍याच दिवसांपासून तुम्ही वाट बघत होता.  
 
या राशीच्या लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे  
शनीची चाल बदलल्याने बर्‍याच राशींसाठी ते योग्य नाही आहे, जसे -वृषभ, मिथुन, तूळ, धनू आणि मकर.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती