जन्मस्थिती आणि तुमचा स्वभाव

जन्म कोणत्या वेळी, प्रहरी झाला त्यावरही आपला स्वभाव अवलंबून असतो. तो कसा हे जाणून घेऊया. 
 
कृष्णपक्षात (अंधारी रात्र) जन्म घेणारे निष्ठूर, द्वेषी स्वभावाचे, क्रूरमती आणि सुंदर नसतात. पण ही मंडळी कष्ट खूप करतात. 
 
रात्री ज्यांचा जन्म होतो असे तामसी स्वभावाचे असतात. लपून छपून काम करण्याची मानसिकता असते. फालतू बडबड करण्याची यांना सवय असते. 

हे ही वाचा.... 
तुमच्यातील वाईट सवय सांगेल तुमची राशी
कोणत्या तिथीला काय खाणे टाळावे? जाणून घ्या...
स्वतःच घर हवे आहे मग, फक्त हे 5 उपाय करा!

ग्रीष्म ऋतूत जन्म घेणाऱे इतरांच्या तुलनेत जिद्दी, हट्टी स्वभावाचे असतात. संतापीही असतात. कृश शरीरयष्टी असते. शिवाय ही मंडळी बोलतातही फार. 
 
आषाढ महिन्यात जन्म घेणारे धार्मिक वृत्तीचे असतात. पण आर्थिक तंगी यांना फार फेडसावते. शास्त्रात यांना अल्पसुखी म्हटले आहे. 
 
कार्तिक महिन्यात जन्मला आलेले काम प्रवृत्तीचे, दुष्ट ह्रदयाचे व कटू बोलून दुसऱ्याचे ह्रदय दुखविणारे असतात. पण हे श्रीमंत होतात. 

माघ महिन्यात जन्माला येणआरे बुद्धिमान असतात. पैसा यांना सहज मिळतो. पण परखड बोलण्यामुळे लोकांमध्ये अप्रिय होतात. यांच्यात कामभावना प्रबल असते. 
 
प्रतिपदेला जन्मलेली मंडळी दुर्जन असतात. त्यांना चांगली संगत मिळत नाही. यांना अनेक व्यसनेही जडू शकतात. 
 
द्वितीयेला जन्मलेले स्वार्थी असतात. परस्त्रीकडे चांगल्या दृष्टीने पहात नाहीत. त्यांचे वर्तनही चांगले नसते. चोरांमध्ये बहुतेकदा हीच मंडळी असतात. 

तृतीयेला जन्मलेली मंडळी महत्त्वाकांक्षी असतात. पण त्याचवेळी त्यांची बुद्धी भलतीकडे चालते.
 
षष्ठीला जन्मलेले लढाऊ प्रवृत्तीचे व संघर्षशील असतात. विवेकबुद्धी यांच्याकडे सहसा नसते. 
 
द्वादशीला जन्मलेल्या मुलाचे आरोग्य वारंवार बिघडते. चंचल स्वभावाचे असतात. 

आमावस्येला जन्मलेली मंडळी आळशी असतात. अंतर्ज्ञानी वा मुर्खही असतात. 
 
सूर्य आमचा आत्मा असतो. तोच आपल्याला जगण्यास शक्ती देतो. आत्मा बलवान असेल तर सर्वच दोष दूर होऊ शकतात. 
 
सूर्याचा शत्रू ग्रह- शुक्र, शनी, राहू आहे. याचा अर्थ शत्रू बलवान असेल तर आत्म्याला त्रास देतो. शुक्र- भोग, शनी- आळशीपणा आणि राहू अज्ञानाशी संबंधित आहे. हे तिघेही सूर्याशी अर्थात आपल्या आत्म्याचे शत्रू आहे.

वेबदुनिया वर वाचा