घरात लाल मुंग्या असण्याचे हे आहे संकेत

असे म्हणतात की धरतीवर जेवढा भार मुंग्यांचा आहे तेवढाच मनुष्यांचा आहे आणि मनुष्यांच्या समान संख्येत कोंबड्या आहेत. आता पुन्हा वळू या मुंग्यांवर. साधारणपणे मुंग्या दोन प्रकाराच्या असतात लाल आणि काळी. काळ्या मुंग्या शुभ मानल्या गेल्या आहेत परंतू लाल नाही.
 
लाल मुंग्यांबद्दल म्हणतात की घरात लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास कर्ज वाढतं. आणि लाल मुंग्या संकटाचे संकेत आहे. अशात लोकं मुंग्या मारण्यासाठी औषध टाकतात. अशात त्यांच्यावर हत्या दोष लागतो म्हणजे सरळ भाषेत म्हणायचं तर एका संकटापासून वाचण्यासाठी दुसर्‍यात संकट ओढणे. अनेकदा लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही मरतात. अशात काय करावे हा प्रश्न आपल्या मनात निश्चितच उद्भवत असेल... 
 
तर जाणून घ्या लाल मुंग्यांना मारण्यासाठी अहिंसक उपाय
लाल मुंग्यांना कोणत्याही प्रकाराच्या कीटनाशक वापरू नये. आपल्या घरात लिंबू तर असेलच. लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील.
 
दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतात.
किंवा लवंग आणि काळी मिरीदेखील वापरू शकता.
 
तसेच मुंग्यांमुळे कर्ज मुक्ती होते. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होतो. हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो.
 
तर मुंग्यांना कणीक देण्याने आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणारे वैकुंठात जातात असे ही मानले गेले आहे. तसेच ऋणमुक्तीसाठी मुंग्यांना कणीक आणि साखर टाकावी. 
 
शेवटी मुंग्यांबद्दल एक शगुन सांगायचे म्हणजे लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणे शुभ असतं. याने संपूर्ण दिवस शुभ आणि सुखात जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती